घरबसल्या पाहता येणार ‘छावा’ सिनेमा, पण कधी आणि कुठे? घ्या जाणून

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिता मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमा (watch)सध्या बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचत आहे. ‘छावा’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमा कधी मोठ्या पडद्यावर येणार याप्रतीक्षेतच चाहते होते. अखेर 14 फेब्रुवारी रोजी चाहत्यांची प्रतीक्षा संपली. ‘छावा’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. तीन दिवसांत सिनेमाने जवळपास 72.4 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आता सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शिक होणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.

मोठ्या पडद्यावर राज्य केल्यानंतर ‘छावा’ सिनेमा कोणत्या ओटीटी प्लेटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात येणार याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. सांगायचं झालं तर, कोणताही सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वी निर्माते त्यांचे डिजिटल अधिकार विकतात. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘छावा’ सिनेमाच्या बाबतीतही असेच काहीसं घडलं आहे. थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वी निर्मात्यांनी सिनेमाच्या ओटीटी रिलीज पार्टनरसोबत (watch) करार केला

मिळालेल्या माहितीनुसार, ‘छावा’ सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix) वर प्रदर्शित होणार आहे. पण सिनेमा कधी प्रदर्शित होणार याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. असं सांगितलं जातं की, सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असल्यास सिनेमा 50 – 60 दिवसांनंतर प्रदर्शित होतो.

‘छावा’ सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 31 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. दुसऱ्या दिवशी सिनेमाने जवळपास 36 कोटींची कमाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, (watch)सिनेमाने आतापर्यंत 72.4 कोटी कमावले आहेत. त्यामुळे सिनेमा मोठ्य पडद्यावर किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारणार महत्त्वाचं ठरणार आहे.

सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत, रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. यांच्यासोबत विनित सिंह, आशुतोष राणा, संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, निलकांती पाटेकर, शुभांकर एकबोटे, दिव्या दत्ता, नील भूपालम, प्रदीप राम सिंह रावत, डाएना पेंटी, रोहीत पाठक यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आाहे.

हेही वाचा :

‘फक्त दोन तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शाह सुद्धा’… ; संजय राऊत यांचा घणाघात

रिलायन्स जिओची सर्वात धमाकेदार ऑफर: 50 दिवसांसाठी मोफत इंटरनेट त्यासोबत…

चिकन खाणाऱ्यांनो सावधान! डॉक्टरांनी दिली सर्वात महत्त्वाची माहिती