महावितरणाच्या नवीन नियमावलीमुळे घरगुती वीजग्राहकांना ‘शॉक’!

‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या आयटी इंजिनिअर्स, डॉक्टर , वकील, सीए यांना निवासी सदनिकेतून काम करणे आता महागात पडणार आहे. महावितरणकडून(Mahavitaran) त्यांना व्यावसायिक वीज बिल आकारले जाणार आहे. मात्र, या धोरणामुळे केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’ला हरताळ फासण्याचे काम केले जात असल्याचा आरोप ‘द सोलर सिस्टीम इंटिग्रेटर्स असोसिएशन’ आणि ‘महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’ने सोमवारी केला.

‘महावितरण’च्या(Mahavitaran) सर्व ग्राहकांना स्मार्ट ‘नेट मीटर’ बसविण्यात येणार असून, ते टीओडी (टाइम ऑफ डे मीटर) असतील. ‘टीओडी’ मीटर देऊन त्यांच्या नव्या निकषांमुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे; परिणामी त्यांचे वीजबिल शून्य न होता, नेहमीप्रमाणेच ते भरावे लागणार आहे.
‘सूर्यघर योजने’च्या मूळ उद्देशाला धक्का लावण्याचे काम या ‘टीओडी’ मीटरच्या माध्यमातून होणार आहे,’ अशी भूमिका ‘द सोलर सिस्टीम इंटिग्रेटर्स असोसिएशन’चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयेश अकोले यांनी पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी ‘महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’चे (मास्मा) अध्यक्ष शशिकांत वाकडे आणि इतर संस्थेतील पदाधिकारी उपस्थित होते.
‘महावितरण’ने नव्या जाचक अटी दाखवून त्याबाबत याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर 26 फेब्रुवारीपासून मुंबई, पुणे , नाशिक येथे सुनावणी होणार आहे. मात्र, त्यात सहभागी होण्यासाठी दिलेली वेबसाइट कार्यान्वित होत नाही, असेही त्यांनी सांगितले.
‘महावितरण’च्या नव्या नियमावलीविरोधात मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री अजित पवार यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे, असेही संघटनेने स्पष्ट केले.
हेही वाचा :
तिजोरीसंबंधी महत्त्वाचे वास्तु नियम; जाणून घ्या संपूर्ण माहिती
कसे दिसायचे छत्रपती संभाजी महाराज? ऐतिहासिक चित्रं पाहाच
भर कार्यक्रमात अर्जुन कपूरनं केलं मलायका अरोराचं तोंड बंद उत्तर देत अभिनेत्री म्हणाली पुढे हो