छळाला कंटाळला ट्रक ड्रायव्हर, RTO ऑफिससमोर दिली जीव देण्याची धमकी; रड रड रडला अन् Video Viral

सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक घटना वेगाने व्हायरल होत आहे. तुम्ही आजवर इथे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना पाहिले असतील. इथे स्टंट्स, अपघात, जुगाड अशा अनेक प्रकारचे व्हिडिओज शेअर केले जातात मात्र सध्या इथे एक अनोखी घटना व्हायरल झाली आहे. यात एक व्यक्ती(Truck driver) RTO ऑफिससमोर आपल्या जीव देण्याची धमकी देताना दिसला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.

तेलंगणा येथील पेद्दापल्ली आरटीओ कार्यालयासमोर अनिल गौड नावाच्या एका ट्रकमालकाने जीव देण्याची धमकी देत आपला निषेध दर्शवला. त्याने यावेळी आरोप केला की, वाहतूक अधिकारी लाच घेण्यासाठी त्याचा छळ करत आहेत. या छळाचा निषेध म्हणून तो त्याच्या ट्रकवर चढला आणि आरटीओ कार्यालयासमोर विजेच्या तारा पकडून आपला जीव देण्याची धमकी देऊ लागला. ही घटना आता वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातील दृश्ये तुम्हाला भावुक करतील.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात तुम्हाला एक व्यक्ती आरटीओ ऑफिससमोर एका ट्रकवर उभा असल्याचे दिसेल. त्याच्या वर विजेच्या तारा लटकत असून या तारांना स्पर्श करून आपला जीव देण्याची धमकी तो यावेळी देत असतो. रागाच्या भरात तो ट्रकवरून(Truck driver) पैशे देखील खाली फेकतो आणि न्यायाची मागणी करताना दिसतो. यात तो भ्रष्टाचार थांवण्याची विनंतीही करतो.

व्यक्ती छळाने इतका त्रस्त होतो की शेवटी त्याचे डोळेही पाणावतात. FPJ च्या वृत्तानुसार, अनिल गौड असे या व्यक्तीचे नाव असून आरटीओ अधिकारी प्रत्येक ट्रक मालकाकडून दरमहा 8000 रुपये लाच घेतात. ही लाच देण्यास नकार देताच त्याचा ट्रक जप्त करून वाहनाविरुद्ध खोटा खटला दाखल केल्याचा आरोप व्यक्तीने केला आहे.

ही संपूर्ण घटना @TeluguScribe नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आली असून याच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया दर्शविल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तेलंगणात लाच घेतल्याशिवाय आरटीओचे कोणतेही काम पूर्ण होणार नाही. बहुतांश भ्रष्ट विभाग सर्व अधिकाऱ्यांवर स्वार होऊन कडक कारवाई करतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कृपया याकडे लक्ष द्या”.

हेही वाचा :

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्याचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर

मस्ती मस्ती 10 व्या मजल्याच्या जिन्यावरून खाली कोसळली अन्… थरकाप उडवणारा Video Viral

‘मी देवेंद्र फडणवीसांकडे पदर पसरणार…’; सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य