बायकोला शिव्या दिल्यामुळे राग भावाने भावालाच पाचव्या मजल्यावरुन ढकललं

पुण्याच्या नांदेड सिटी पोलीस ठाणे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका(push back) तरुणाने आपल्या चुलत भावाला इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून ढकलून दिले, यात त्या भावाचा जागीच मृत्यू झाला. कौटुंबिक वादातून पत्नीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून, नांदेड सिटी पोलीस पुढील तपास करत आहेत.

अमर देशमुख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे, तर राजू भुरेलाल देशमुख असं आरोपीचं नाव आहे. आरोपी राजू आणि अमर हे चुलत भाऊ असून, मूळचे मध्य प्रदेशातील बालाघाटचे रहिवासी आहेत. ते कामासाठी पुण्यात आले होते. पुण्यातील धायरी परिसरातील एका सोनपापडी बनवण्याच्या कारखान्यात (push back)दोघेही काम करत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता
आरोपी राजू कौटुंबिक कारणावरून अमरच्या पत्नीला शिवीगाळ करत होता. घटनेच्या दिवशीही राजूने असंच केलं. यामुळे अमर आणि राजूमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यावर अमर राजूला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेला, पण झटापटीत राजूने अमरला पाचव्या मजल्यावरून खाली ढकलून दिले. यात (push back)अमरचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना धायरी परिसरातील कपील अपार्टमेंटमध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच नांदेड सिटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी आरोपी राजूला अटक केली. त्याच्यावर हत्येसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :
250 रुपयांत SIP योजना, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Box Office वर ‘छावा’ची गर्जना; लवकरच 200 Cr क्लबमध्ये….
महावितरणाच्या नवीन नियमावलीमुळे घरगुती वीजग्राहकांना ‘शॉक’!