‘छावा’ चित्रपटादरम्यान प्रेक्षकाचा राडा; थेट सिनेमागृहाचा पडदाच फाडला!

सध्या बॉक्स ऑफिसवर विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट चांगली कमाई करत आहे. गेल्या महिन्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. चित्रपटाच्या टीमने जोरदार प्रमोशन केले. अजूनही विकी कौशल चित्रपटाबाबत मुलाखती देत आहे. चित्रपटाचे सकाळी 6 पासूनचे शो देखील हाऊसफुल आहेत, तसेच रात्री उशिरापर्यंतचे शो पाहण्यासाठी प्रेक्षक(Audience) गर्दी करत आहेत.

प्रेक्षक चित्रपट पाहतानाचे किंवा त्यांना आवडलेल्या भागांचे व्हिडिओ शेअर करत आहेत. अशातच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ‘छावा’ चित्रपट पाहताना एका प्रेक्षकाने(Audience) चक्क सिनेमाचा पडदा फाडल्याची घटना घडली आहे. ही घटना गुजरातमधील भरूचमध्ये घडली. रात्री 11.45 च्या शोदरम्यान हा प्रकार घडला.
चित्रपटाचा महत्त्वाचा क्लायमॅक्स सुरू असतानाच ही घटना घडली. चित्रपटाच्या पडद्यावर औरंगजेब शंभूराजांना कैद करून त्यांचा छळ करत असल्याचा सीन सुरू होता. तेव्हा एक प्रेक्षक उठला आणि त्याने रागात सिनेमाचा पडदा फाडला. त्यामुळे थिएटरमधील पडद्याचे नुकसान झाले.

नुकसान होताच थिएटर मालकाने पोलिसांना याबाबत कळवले. कर्मचाऱ्यांनी त्या प्रेक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी प्रेक्षक शुद्धीत नव्हता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी प्रेक्षकांनी दिली. पडदा फाटल्यामुळे काही प्रेक्षकांना दुसऱ्या स्क्रीनवर चित्रपट दाखवण्यात आला, तर काहींना त्यांचे पैसे परत करण्यात आले.
‘छावा’ चित्रपटाने 4 दिवसांत 140 कोटींचा टप्पा पार केला आहे, तर जगभरात चित्रपटाची कमाई 160 कोटींच्या वर पोहोचली आहे. या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर रश्मिकाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. अभिनेता अक्षय खन्नाने औरंगजेबाच्या भूमिकेत उत्कृष्ट अभिनय केला आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बनतंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर!
जीबीएसचा धोका वाढला! या गोष्टींवर आणणार निर्बंध? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
‘रात्री फक्त 2 तासांसाठी गर्लफ्रेंड हवी’; प्रसिद्ध अभिनेत्याचं खळबळजनक वक्तव्य