अखेर प्रतिक्षा संपली! आज लाँच होणार Apple चा स्वस्त iPhone

19 फेब्रुवारी रोजी आज टेक कंपनी अॅपलचा ईव्हेंट आयोजित केला जाणार आहे आणि या ईव्हेंटमध्ये आज कंपनीचा स्वस्त आयफोन लाँच (launched)केला जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आयफोन प्रेमींना ज्या दिवसाची प्रतिक्षा होती, ती आता संपली आहे. कारण आज आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये iPhone SE 4 लाँच केला जाणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की या फोनचे नाव iPhone 16E असू शकते. मात्र फोनची किंमत इतर आयफोनपेक्षा नक्कीच कमी असणार आहे. कारण कंपनीने घोषणा केल्या प्रमाणे हा स्वस्त आयफोन असणार आहे.

इतर आयफोन लाँचिंगप्रमाणे हा भला मोठा ईव्हेंट नसेल, प्री-रेकॉर्ड व्हिडिओ किंवा प्रेस रिलीजद्वारे iPhone SE 4 लाँच केला जाणार आहे. मात्र हे लाँचिंग(launched) लाईव्ह पाहता येणार आहे. आयफोनचं डिझाईन कसं असेल, त्याची किंमत काय असेल, लाईव्ह लाँचिंग कधी आणि कसं पाहता येईल, याबद्दल आता जाणून घेऊया.
आधुनिक डिझाइन आणि सुधारित कॅमेरा यासारख्या वैशिष्ट्यांसह आज iPhone SE 4 लाँच केला जाणार आहे. अॅपलचा कार्यक्रम 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता (पॅसिफिक वेळेनुसार) सुरू होणार आहे. म्हणजेच भारतीय वेळेनुसार हा ईव्हेंट रात्री 11.30 वाजता सुरु होणार आहे. यूएसएमध्ये ही वेळ सकाळी 10:00 PT / 1:00 PM ET आहे. यूकेमध्ये संध्याकाळी 6:00 वाजता, दुबईमध्ये रात्री 10:00 वाजता, पाकिस्तानमध्ये रात्री 11:00 वाजता, फ्रान्स (युरोप) मध्ये संध्याकाळी 7:00 वाजता हा ईव्हेंट लाईव्ह होणार आहे.
अॅपलच्या अधिकृत वेबसाइट, यूट्यूब चॅनेल आणि अॅपल टीव्ही अॅपवर हा ईव्हेंट लाईव्ह केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी ईव्हेंटची लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकता. कार्यक्रम लाईव्ह केला, तर जगभरातील चाहत्यांना तो पाहणे सोपे होईल. Apple.com वर तुम्हाला लाँच इव्हेंटचे प्रमुख अपडेट्स पाहता येतील.

भारतात iPhone SE 4 हा 50,000 रुपयांना लाँच केला जाण्याची शक्यता आहे. तर यूएसएमध्ये हा फोन $500 च्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. तर दुबईमध्ये ही किंमत AED 2,000 असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाँच झाल्यानंतर लगेचच त्याची प्री-ऑर्डर सुरू होऊ शकते आणि त्याची विक्री पुढील आठवड्यापर्यंत सुरू होईल. मात्र अद्याप कंपनीने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
iPhone SE 4 एका नव्याकोऱ्या लूकसह आज एंट्री करणार आहे. नवीन SE मॉडेलला नवीन डिझाइन दिले जात आहे. हा फुल-स्क्रीन डिझाइनमध्ये लाँच(launched) केला जाईल आणि त्यात फेस आयडी फीचर असेल. अशाप्रकारे, अॅपल 18 वर्षांनंतर आपल्या पहिल्या आयफोनसह सादर केलेल्या होम बटणाला निरोप देईल. हे यूएसबी-सी पोर्टसह येईल आणि म्यूट स्विचऐवजी, त्यात आयफोन 16 सारखे अॅक्शन बटण असेल. आयफोन एसई 4 मध्ये अॅपलची नवीनतम 3 एनएम ए18 चिप असेल. हाच चिपसेट आयफोन 16 मध्ये देखील उपलब्ध आहे, जो 8 जीबी रॅमसह जोडला जाईल. त्यात किमान 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते. मागील बाजूस, डॉल्बी व्हिजनमध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्टसह 48MP सिंगल लेन्स आणि सेल्फीसाठी 12MP फ्रंट कॅमेरा असेल.
हेही वाचा :
महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बनतंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर!
जीबीएसचा धोका वाढला! या गोष्टींवर आणणार निर्बंध? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
‘रात्री फक्त 2 तासांसाठी गर्लफ्रेंड हवी’; प्रसिद्ध अभिनेत्याचं खळबळजनक वक्तव्य