BSNL च्या ग्राहकांसाठी गूड न्यूज; कंपनीने आणला स्वस्त प्लॅन

बीएसएनएलने आणखी एक स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये (data)वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि मोफत एसएमएसचाही लाभ मिळतो. भारत संचार निगम लिमिटेड आपल्या स्वस्त प्लॅन्सद्वारे एअरटेल , जिओ आणि व्होडाफोन आयडिया यांसारख्या खाजगी दूरसंचार कंपन्यांना चांगलीच टक्कर देत आहे.कंपनी आपल्या ग्राहकांसाठी कमी किमतीत दीर्घ वैधतेसह अनेक स्वस्त प्लॅन आणत आहे. बीएसएनएल आपल्या नेटवर्कमध्येही सुधारणा करत आहे. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना संपूर्ण भारतात अमर्यादित मोफत कॉलिंग मिळते. यासोबतच, दिल्ली आणि मुंबईच्या एमटीएनएल क्षेत्रांसह संपूर्ण भारतात मोफत राष्ट्रीय रोमिंगचा लाभ मिळतो.

बीएसएनएलच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी हाय-स्पीड (data)डेटा मिळतो. तसेच, वापरकर्त्यांना दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतात. या प्लॅनमध्ये 54 दिवसांची वैधता मिळते. इतकेच नाही, तर वापरकर्त्यांना BiTV चे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे, ज्यामुळे 450 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल आणि ओटीटी ॲप्सचा आनंद घेता येतो.
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलसाठी चांगले दिवस आले आहेत. अलीकडेच, सरकारने कंपनीला पुन्हा उभारी देण्यासाठी 6,000 कोटी रुपयांचे नवीन पॅकेज जाहीर केले आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाने बीएसएनएल आणि एमटीएनएलच्यानेटवर्क सुधारण्यासाठी या पॅकेजला (data)मंजुरी दिली आहे. ज्यामुळे बीएसएनएल वापरकर्त्यांना संपूर्ण भारतात चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. कंपनी नवीन 4G मोबाईल टॉवर्सदेखील बसवत आहे. आतापर्यंत 65,000 नवीन 4G मोबाईल टॉवर्स सुरू केले आहेत, आणि लवकरच ही संख्या 1 लाखांपर्यंत वाढवणार आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बनतंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर!
जीबीएसचा धोका वाढला! या गोष्टींवर आणणार निर्बंध? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
‘रात्री फक्त 2 तासांसाठी गर्लफ्रेंड हवी’; प्रसिद्ध अभिनेत्याचं खळबळजनक वक्तव्य