जिओचा JioTele OS लॉन्च, गुगलच्या अँड्रॉईड टीव्हीपेक्षा स्वस्त? गुगलला टक्कर देणार?

जिओ(Jio) आता गुगलला टक्कर देणार आहे. कारण, जिओने टेलिव्हिजन ऑपरेटिंग सिस्टीम Jiotele Os सादर केला आहे. विशेष म्हणजे हा टीव्ही गुगलच्या अँड्रॉईड टीव्हीपेक्षा स्वस्त असल्याचं बोललं जात आहे. या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये AI चालित कंटेंट सुचवला जाईल, जेणेकरून कोणताही कंटेंट सर्च करायला जास्त वेळ लागणार नाही. Jiotele Os वर चालणारा स्मार्ट टीव्ही 21 फेब्रुवारी 2025 पासून बाजारात उपलब्ध होणार आहे.

जिओने स्वत:चा टेलिव्हिजन Os सादर केला आहे. सोप्या भाषेत टेलिव्हिजन Jiotele Os समजला तर गुगलने ज्याप्रमाणे स्मार्ट टीव्हीसाठी अँड्रॉइड टीव्ही ऑपरेटिंग सिस्टीम ऑफर केला आहे. त्याचप्रकारे जिओने आपला Jiotele Os सादर केला आहे. ही भारताची स्वतःची स्वदेशी टेलिव्हिजन ऑपरेटिंग सिस्टीम असेल. ही गुगलच्या तुलनेत खूप परवडणारी असेल.
स्मार्ट टीव्ही बनवण्याचा खर्च कमी होऊ शकतो, कारण Jiotele Os अतिशय कमी किंमतीत Os उपलब्ध करून देणार आहे. जिओचे म्हणणे आहे की, ही नेक्स्ट जनरेशन स्मार्ट टीव्ही ऑपरेटिंग सिस्टीम असेल, जी स्मार्ट टीव्ही पाहण्याचा अनुभव बदलू शकते.
एका रिपोर्टनुसार, भारतात सध्या जवळपास 35 लाख कनेक्टेड टीव्ही आहेत. Jiotele Os भारतातील वाढत्या डिजिटल मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करेल. कनेक्टेड स्मार्ट टीव्हीमध्ये अनेक निर्बंध असल्याने काही ग्राहकांना स्मार्ट टीव्हीमध्ये करमणुकीचा चांगला अनुभव मिळत नसल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे युजर्सना कस्टमायझेशनच्या बाबतीत तडजोड करावी लागते. तसेच, ग्राहकांना उच्च दर्जाचा प्रादेशिक कंटेंट पाहता येत नाही. स्मार्ट टीव्ही युजर्सना अखंड आणि प्रीमियम युजरचा अनुभव मिळत नाही.
जिओ(Jio) डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि मनोरंजन क्षेत्रात आघाडी घेण्याचा प्रयत्न करत आहे. जिओला आपल्या Jiotele Os च्या मदतीने प्रत्येक भारतीयाला वेगवान, प्रीमियम आणि कंटेंट समृद्ध स्मार्ट टीव्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा आहे. यात AI संचालित सूचना मिळतात. तसेच, प्रादेशिक आणि जागतिक सामग्रीचे उत्तम एकत्रीकरण आहे. हे अग्रगण्य अॅप्स आणि नियमित अपडेट्स प्रदान करते.

Jiotele Os ची महत्त्वाची वैशिष्ट्ये कोणती?
-या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये AI चालित कंटेंट सुचवला जाईल, जेणेकरून कोणताही कंटेंट सर्च करायला जास्त वेळ लागणार नाही.
-यात लॅग-फ्री 4G अनुभव मिळेल. म्हणजेच इंटरनेटच्या मदतीने स्मार्ट टीव्ही चालवण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
-त्यात टीव्ही आणि शोजची मोठी लायब्ररी असणार आहे. तसेच टीव्ही चॅनेल्स, क्लाऊड स्टोरेज आणि फेव्हरेट ओटीटी अॅप्सचे -सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
-यात रेग्युलर अपडेट्स दिले जातील
उपलब्धता आणि ब्रँड भागीदारी
Jiotele Os वर चालणारा स्मार्ट टीव्ही 21 फेब्रुवारी 2025 पासून बाजारात उपलब्ध होणार आहे. थॉमसन, कोडॅक, बीपीएल आणि जेव्हीसी सारखे ब्रँड स्मार्ट टीव्हीमध्ये जिओ ओएस प्रदान करतील. तसेच नवीन ब्रँडही लवकरच या लाइनअपमध्ये सामील होतील.
हेही वाचा :
सनम तेरी कसम 2 मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री नाही या बॉलिवूड अभिनेत्रीचा जलवा
गॅस लीक, घरात आग, 6 जणांची दुसऱ्या मजल्यावरून उडी!video viral
विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही, ज्याला जे वाटतं ते टाकतोय; सरकारने कारवाई केली, पण पुरेसी नाही : शाहू महाराज