लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! आठ दिवसांत खात्यात जमा होणार १५००

लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता पुढच्या आठ दिवसांत(credit account)लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.महिला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या. दरम्यान, आता हे पैसे लवकरच महिलांना मिळणार आहे.फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांचा आहे. त्यामुळे पुढच्या आठ दिवसांत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जातील. मागील तीन महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहे. या महिन्यातही शेवटच्या आठवड्यात पैसे जमा करतील.

मार्च महिन्यात ३ तारखेला राज्याचं (credit account)अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्याआधी कदाचित महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु आहे. अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच महिलांना पैसे दिले जाणार आहेत.यासाठी अजून काही दिवस लागू शकतात. त्यामुळे आता पैसे कधीपर्यंत येणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.विधानसभा निवडणूकीपूर्वी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले जात होते. विधानसभा निवडणूका होऊन तीन महिने झाले आहेत तरीही लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळाले नाहीत. हे पैसे कदाचित राज्याच्या अर्थसंकल्पानंतर दिले जाऊ शकतात. अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री (credit account)अजित पवार याबाबत मोठी घोषणा करु शकतात. या अर्थसंकल्पानंतर कदाचित २१०० रुपये दिले जाऊ शकतात.

हेही वाचा :

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बनतंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर!

जीबीएसचा धोका वाढला! या गोष्टींवर आणणार निर्बंध? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

‘रात्री फक्त 2 तासांसाठी गर्लफ्रेंड हवी’; प्रसिद्ध अभिनेत्याचं खळबळजनक वक्तव्य