दोन दिवसांत धमाका, मोठे नेते करणार ठाकरेंना जय महाराष्ट्र; मंत्री सामंताचा दावा

विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर महाविकास आघाडीला(politics) गळती लागली आहे. या पक्षगळतीचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसत आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. हा सिलसिला अजूनही कायम आहे. शिंदे गटातील नेतेही मोठे दावे करत आहेत.

आताही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे (politics)गटात खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. दोन दिवसांत पुण्यातील काही नेते आमच्या पक्षात येणार आहेत. कोण आमच्या पक्षात प्रवेश करणार त्यांची नावे मी सांगणार आहे, असा दावा मंत्री सामंत यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑपरेशन टायगर सुरू आहे. या अंतर्गत ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी कार्यकर्ते शिंदेसेनेत दाखल होत आहेत. या मोहीमेबद्दल बोलताना सामंत म्हणाले, ऑपरेशन टायगर हे नाव पत्रकारांनीच दिलं आहे. राज्यात बाळासाहेब ठाकरेंचा विचार एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत.
महाविकास आघाडी सत्तेत येत असताना शरद पवार आणि अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाला विरोध केला. अन्यथा मविआच्या काळातच शिंदे मुख्यमंत्री झाले असते असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावरही सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. माझ्या माहितीनुसार शरद पवार अन्य पक्षांत कोणताही हस्तक्षेप करत नाहीत. परंतु, काही लोकांनी स्वतःला मुख्यमंत्रिपद मिळावं म्हणून एकनाथ शिंदेंना सांगितलं की तुमच्या नावाला शरद पवारांचा विरोध आहे.

दरम्यान, राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षात पक्षबदलाचे वारे वाहत आहेत. काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या तुलनेत ठाकरे गटात धावपळ सुरू आहे. दिवसागणिक पक्षांतराच्या बातम्या येत आहेत. राज्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षबांधणीसाठी ठाकरे गटाची तयारी सुरू झालेली असतानाच दुसरीकडे पक्षफुटीने नेते हैराण झाले आहेत.
एकनिष्ठ म्हणवले जाणारे नेतेही आता उद्धव ठाकरेंची साथ सोडत आहेत. मागील आठवड्यात माजी आमदार राजन साळवी यांनीही ठाकरेंना जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर आता कोकणातील आमदार भास्कर जाधव देखील साथ सोडतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. खुद्द भास्कर जाधव यांनीच पक्षात क्षमतेप्रमाणे काम करू दिले जात नसल्याचे सांगितले होते.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! आठ दिवसांत खात्यात जमा होणार १५००
होळीनंतर ‘या’ राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम; उत्साहाचे वारे वाहणार, हातात पैसा खेळणार
अक्षय कुमारच्या शिवलिंगासोबतच्या ‘त्या’ दृश्यावर आक्षेप; ‘महाकाल चलो’ गाण्यावरून वाद