दहावीतल्या पोरींचा कारनामा, बॉयफ्रेंडच्या नादी लागून केलं असं काही की घरचे हादरले

गुजरात मधील अहमदाबाद येथे घडलेल्या एका घटनेने खळबळ उडाली आहे. दहावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे(girls) अनुक्रमे एका अल्पवयीन मुलावर आणि एका तरुणावर प्रेम जडले. यानंतर त्या शाळा आणि शिकवणीला दांडी मारून बाहेर फिरण्यासाठी जाऊ लागल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एस. जी. महामार्गाजवळ राहणाऱ्या या दोन मुली सीबीएसई बोर्डात दहावीत शिकत आहेत. एक मुलगी अल्पवयीन मुलासोबत मैत्रीत होती, तर दुसरी एका तरुणाच्या प्रेमात होती. हे चौघे अनेकदा भेटत आणि घरापासून दूर फिरायला जाण्याची योजना आखत होते.
एके दिवशी, एका मुलीने(girls) गंमत म्हणून आपल्या घरातून सोन्याचे दागिने चोरले. त्यानंतर चौघेही अहमदाबादहून निघाले. फिरत फिरत ते मुंबईत पोहोचले, तिथे मुलीने दागिने विकून सुमारे ७० हजार रुपये मिळवले. मिळालेल्या पैशातून ते गोव्याला फिरायला गेले.

मुलींच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासातून, एक मुलगी तिच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत बोलत असल्याचे समोर आले. पोलिसांनी तांत्रिक मदतीने चौघांनाही गोव्यातून शोधून काढले. चौघांनाही अहमदाबादला आणले आणि मुलींना बालसुधारगृहात पाठवून पुढील कारवाई सुरू केली.
अहमदाबादहून निघाल्यानंतर चौघांनीही फोन बंद ठेवले होते आणि केवळ वायफायचा वापर करत होते, जेणेकरून त्यांचा शोध घेणे कठीण होईल. परंतु, एक मुलगी इन्स्टाग्रामद्वारे कोणाशी तरी बोलत असल्याचे पोलिसांना आढळले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास पुढे नेत चौघांनाही गोव्यात पकडले. अल्पवयीन मुली दहावीत शिकत असल्याने महिला पोलिसांच्या देखरेखेखाली त्यांची दहावीची परीक्षा घेण्यात आली.
हेही वाचा :
लाडकी बहीण योजनेतील तुमचे 1500 रुपये बंद होणार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी
ज्याची भीती होती तेच झालं! युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला?