रोहित शर्माने माती खाल्ली, अक्षर पटेलची हॅटट्रिक हुकली! हिटमॅनने हात जोडून माफी मागितली

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या पहिल्याच सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने(Rohit Sharma) एक चूक केली. ज्यामुळे टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलची हॅटट्रिक हुकली. ज्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे मन तुटले. दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यात फिरकी गोलंदाज अक्षर पटेल त्याची हॅटट्रिक पूर्ण करण्याच्या जवळ होता, पण कर्णधार रोहितने एक अतिशय सोपा झेल सोडला.

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध गुरुवार 20 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेश संघाची या सामन्यात सुरुवात खूपच खराब झाली आणि संघाने पहिल्या 2 षटकात 2 गडी गमावले. यानंतर, संघाची तिसरी विकेट 26 धावांवर पडली, परंतु 35 धावांवर अक्षर पटेलने बांगलादेशची चौथी आणि पाचवी विकेट घेतली. त्यावेळी तो हॅटट्रिक पूर्ण करण्याच्या अगदी जवळ होता, पण रोहितने झेल सोडला आणि हॅटट्रिक हुकली.
सलग 8 षटकांच्या वेगवान गोलंदाजीनंतर कर्णधार रोहित शर्माने नवव्या षटकात अक्षर पटेलच्या हातात चेंडू दिला. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने तन्जीद हसनला झेलबाद केले, ज्याने 25 चेंडूत 25 धावा केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने मुशफिकुर रहीमला शून्यावर झेलबाद केले आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सलग 2 चेंडूत 2 बळी घेतल्यानंतर अक्षरला हॅटट्रिकची संधी होती. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर झहीर अलीने खेळलेला शॉट स्लिपमध्ये रोहितकडे गेला. पण रोहित तो झेल घेऊ शकला नाही.
If you want to abuse rohit sharma here is the video :pic.twitter.com/FC7yPqHDcD
— Rathore (@exBCCI_) February 20, 2025
रोहितच्या(Rohit Sharma) या चुकीवर कोणत्याही भारतीय खेळाडूला विश्वास बसला नाही. स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले आणि त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. कर्णधार रोहित स्वतः खूप रागावलेला दिसला आणि त्याने जोरात मैदानावर हात आपटायला सुरुवात केली आणि नंतर यानंतर रोहित शर्माने हात जोडून माफी मागितली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात हॅटट्रिक घेणारा अक्षर पहिला भारतीय आणि दुसरा गोलंदाज बनला असता पण त्याने ही संधी गमावली.
हेही वाचा :
महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांना दोन वर्षांचा कारावास…
लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारी पैशाने दिलेली लाच, या योजनेमुळे… : राजू शेट्टींचा आरोप
दहावीतल्या पोरींचा कारनामा, बॉयफ्रेंडच्या नादी लागून केलं असं काही की घरचे हादरले