महापालिका निवडणुकीपूर्वीच ‘हा’ नेता करणार भाजपमध्ये प्रवेश; ठाकरे गटाला बसणार धक्का

छत्रपती संभाजीनगर : ऐन विधानसभा निवडणुकीवेळी भाजपातून(political updtaes) ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधणारे माजी उपमहापौर राजू पुन्हा घरवापसी करणे निश्चित झाले आहे. मात्र, त्यांच्या परतीस भाजपातील काही पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याने हा प्रवेश लांबला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गत आठवड्यात शहरात आले होते. तेव्हा शिंदे व बावनकुळे यांच्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मध्यस्ती घडवून आणत त्यांच्या परतीचे दार खुले केल्याचे सूत्रांनी सांगितले.

राजू शिंदे यांचा जनसंपर्क व मतांवर असलेली पकड लक्षात घेता लवकरच हा प्रवेश सोहळा होणार आहे, असे काहीसे सांगण्यात येत आहे. शिंदे यांनी विद्यमान आमदार व मंत्री संजय शिरसाट यांच्या विरूद्ध औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात दोन वेळा निवडणूक लढविली आहे. अर्थात यात त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना एक लाखापेक्षा जास्त मतदान झाले होते.

शिंदे यांना पक्षाने नगरसेवक, उपमहापौर अशी संधी दिलेली आहे. महानगरपालिकेत अनेक पदांवर संधी दिली. मात्र, त्यांनी दोनवेळा पक्षाच्या विरोधात जाऊन विधानसभा(political updtaes) निवडणुका लढवल्या. तसेच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी लॉबिंग केल्याचा आरोप शिंदे यांच्यावर झाला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला. या निवडणुकीत त्यांनी एक लाखापेक्षा अधिक मते घेतली. परंतु त्यांचा पराभव झाला.

रावसाहेब दानवे यांचा त्यांच्यावर पहिल्यापासून वरदहस्त असल्याने सावे व बोराळकर यांचा विरोध असला तरी त्यांना पक्षात परत घेतले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. उमेदवारासाठी त्यांनी परिश्रम घेतल्याचे मनपा निवडणुकीमुळे समोर आले होते.

कोणत्याही परिस्थिती पक्षाचाच महापौर करणे भाजपचे ध्येय असून, त्यादृष्टीने शिंदे यांना परत पक्षात घेतले जाण्याचीच अधिक शक्यता आहे. यासाठी एक गट वरिष्ठांकडे पाठपुरावा करत आहे. दरम्यान, शिरीष बोराळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेतेच याबाबत निर्णय घेतील. शहरातील नेतेमंडळी, प्रदेशाध्यक्ष हे काय ते ठरवतील, अशी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा :

महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांना दोन वर्षांचा कारावास…

लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारी पैशाने दिलेली लाच, या योजनेमुळे… : राजू शेट्टींचा आरोप

रोहित शर्माने माती खाल्ली, अक्षर पटेलची हॅटट्रिक हुकली! हिटमॅनने हात जोडून माफी मागितली

लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारी पैशाने दिलेली लाच, या योजनेमुळे… : राजू शेट्टींचा आरोप