महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ, फोटो काढून…; कुंभमेळ्यातील संतापजनक प्रकार समोर

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ(Kumbh Mela) मेळाव्यात भाविकांची, विशेषत: महिलांची मोठी गर्दी झाली आहे. त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी आलेल्या लाखो भाविकांमध्ये हा धार्मिक सोहळा उत्साहात पार पडत आहे. पण याच दरम्यान एक अत्यंत गंभीर आणि निंदनीय प्रकार उघडकीस आला आहे, ज्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

महाकुंभ(Kumbh Mela) मेळाव्यादरम्यान, काही समाजकंटकांनी महिलांचे कपडे बदलतानाचे आणि स्नानाचे फोटो आणि व्हिडिओ चोरून काढून ते सोशल मीडियावर विकण्याचा धक्कादायक प्रकार केला आहे. हे कृत्य उघडकीस येताच महाकुंभ परिसरातील कोतवाली पोलिसांनी तातडीने दखल घेत १५ सोशल मीडिया चॅनेलविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी अधिक तपास करत असताना, पोलिसांना असे आढळून आले की, कुंभ परिसरात स्नान करणाऱ्या महिलांचे कपडे बदलतानाचे फोटो आणि व्हिडिओ टेलीग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चक्क १९९९ रुपयांना विकले जात आहेत. पोलिसांनी या गंभीर घटनेची दखल घेऊन स्वतःहून फिर्याद नोंदवली आहे. प्रयागराजमध्ये गंगा स्नानासाठी आलेल्या महिला आणि मुलींचे खासगी व्हिडिओ आणि फोटो तयार करून ते व्हायरल केले जात असल्याचे समोर आले आहे.
हे व्हिडिओ आणि फोटो महिला जेव्हा त्रिवेणी संगमावर स्नान करून कपडे बदलण्यासाठी जात होत्या, तेव्हा चोरून रेकॉर्ड करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, हे सर्व व्हिडिओ आणि फोटो टेलीग्रामवर विकले जात आहेत, आणि काही मेटा प्लॅटफॉर्मवर देखील शेअर करण्यात आले आहेत.

पोलिसांनी या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. ‘neha1224872024’ नावाचे इंस्टाग्राम अकाउंट आणि ‘Cctv channel 11’ नावाचे चॅनेल, महाकुंभासाठी आलेल्या महिलांचे स्नानाचे व्हिडिओ आणि फोटो वेगवेगळ्या किंमतीत विकत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी आता या युजर्सची माहिती मेटाकडून मागवली आहे.
सोशल मीडियावर हे खासगी फोटो व्हायरल होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. काही फोटो आक्षेपार्ह सामग्री म्हणून विकले जात आहेत. एका पोस्टमध्ये, ‘Cctv channel 11’ नावाच्या टेलीग्राम पोस्टचा स्क्रीनशॉट जोडलेला आहे, ज्यात महिलांचे स्नानाचे व्हिडिओ १९९९ रुपयांच्या सदस्यत्वासह मिळतील असे नमूद केले आहे. पोलिस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :
मोठी बातमी! भाजप आमदार यांना जीवे मारण्याची धमकी
एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, बुलढाण्यातून मामा भाच्याच्या जोडीला अटक
मोबाईलमुळे मोडलं लग्न! नवरीचे ‘इंस्टाग्राम रिल्स’ पाहून नवरदेवाने घेतला मोठा निर्णय