सौरव गांगुलीवर येणार बायोपिक, ‘हा’ अभिनेता साकारणार ‘दादा’ची भूमिका!

कपिल देव, एम एस धोनी आणि मिताली राज यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या जीवनावर आधारित चित्रपट(Biopic) बनले आहेत. आता या यादीत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांचे नावही जोडले जाणार आहे.

सौरव गांगुली यांनी स्वतः एका मुलाखतीत या वृत्ताला दुजोरा दिला आहे की, त्यांच्या जीवनावर बायोपिक(Biopic) बनणार आहे आणि अभिनेता राजकुमार राव त्यांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी यापूर्वी आयुष्मान खुराना, रणबीर कपूर आणि प्रोसेनजीत चॅटर्जी यांच्या नावांची चर्चा होती.
सौरव गांगुली यांनी एका मुलाखतीत सांगितले, “मी ऐकल्याप्रमाणे, राजकुमार राव मुख्य भूमिकेत असेल, परंतु तारखांबाबत काही अडचणी आहेत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित व्हायला एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागू शकतो.”
सौरव गांगुली भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 2002 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संयुक्त विजेतेपद मिळवले आणि 2003 च्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत गांगुली नवव्या स्थानावर आहेत. त्यांनी एकदिवसीय कारकिर्दीत 11,363 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी एकूण 18,575 धावा केल्या.

सौरव गांगुली यांच्या बायोपिकच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. यापूर्वी एम एस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, कपिल देव, प्रवीण तांबे आणि मिताली राज यांच्यावर बायोपिक बनले आहेत. सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर एक डॉक्युमेंटरी देखील प्रदर्शित झाली आहे. सौरव गांगुली व्यतिरिक्त युवराज सिंगच्या बायोपिकवरही काम सुरू आहे, पण त्याची प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
हेही वाचा :
महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ, फोटो काढून…; कुंभमेळ्यातील संतापजनक प्रकार समोर
भारत-पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यापूर्वी ICC ची मोठी कारवाई!
पेपर सुरू होताच प्रश्नपत्रिका केंद्राच्या बाहेर; दहावीचा पेपर फुटल्याने खळबळ