अवघ्या 48 तासांनी ‘या’ 3 राशींचं उजळणार भाग्य; बॅंक बॅलेन्स होणार दुप्पट

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतराने राशी (heroscope)परिवर्तन करतात. याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. ग्रहांचा राजा सेनापती मंगळ ग्रह जवळपास 56 दिवसांनंतर राशी परिवर्तन करतात ज्यामुळे कोणत्या ना कोणत्या ग्रहांबरोबर युती होते. सध्या मंगळ ग्रह मिथुन राशीत विराजमान आहे. तर, मंगळ ग्रह बुध ग्रहाबरोबर नवपंचम राजयोग निर्माण करणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, 23 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजून 26 मिनिटांनी बुध आणि मंगळ ग्रह एकमेकांच्या 120 डिग्री अंतरावर असणार आहे. यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. याचा काही राशींना(heroscope) लाभ मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मीन रास
मीन राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या भविष्यावर चांगलं लक्ष केंद्रित करु शकता. तसेच, व्यवसायिक क्षेत्रात तुमचा चांगला विस्तार झालेला पाहायला मिळेल. तुमच्याकडून कोणत्याच चुका किंवा चुकीचं काम घडणार नाही. जोडीदाराचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, तुम्हाला धनलाभ मिळू शकतो.
कर्क रास
मंगळ-बुध ग्रहाने जुळून आलेला नवपंचम राजयोग कर्क राशीच्या लोकांसाठी फार भाग्यवान ठरु शकतो. यामुळे तुमच्या जीवनात सुख-शांती टिकून राहील. तसेच कुटुंबियांबरोबर तुमचा चांगला वेळ जाईल. तुमच्या बौद्धिक क्षमतेत चांगली वाढ झालेली दिसेल. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ देखील मिळेल. तुमच्या जीवनात सुख-शांती नांदेल. तसेच, नोकरीत चांगलं यश मिळेल.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळ-बुध ग्रहामुळे जुळून येणारा नवपंचम राजयोग फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदाला सीमा नसणार. कुटुंबियांबरोबर तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात. तसेच, तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. जे तरुण नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
वीज ग्राहकांना शॉक! ‘इतक्या’ टक्के दरवाढीची शक्यता
जीवे मारण्याच्या धमकीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “डान्सबार बंद केल्यावर… “
सौरव गांगुलीवर येणार बायोपिक, ‘हा’ अभिनेता साकारणार ‘दादा’ची भूमिका!