Google Pay युजर्संना मोठा झटका आता पेमेंट करण्यासाठी मोजावे लागणार पैसे

आजकाल सर्वकाही डिजिटल झालं आहे. अगदी भाजीपाला घेण्यापासून ते (buying)महागड्या गोष्टी घेण्यासाठी सर्वजण ऑनलाइन पेमेंट करतात. दरम्यान आता गुगल पे युजर्ससाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गुगल पेवरुन पेमेंट करणे आता महागणार आहे. जर तुम्ही गुगल पेवरुन कोणतेही बिल भरत असाल तर तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागणार आहे.

स्टेट बँकेची नवीन SIP स्कीम! महिन्याला २५० रुपये गुंतवा ४० वर्षात मिळतील ७८ लाख; जाणून घ्या कॅलक्युलेशन
गुगल पेवरुन वीजबिल, पाणी बिल आणि गॅस बिल भरण्यासाठी जास्त शुल्क आकारले जाणार आहे. या पेमेंटवर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवरील ट्रान्झॅक्शनर करण्यावर सुविधा (buying)चार्ज लावण्याची घोषणा केली आहे.

रिपोर्टनुसार, Google Pay ०.५ % ते १% पर्यंत चार्ज लावणार आहे. यावर जीएसटीदेखील लागू होणार आहे. याआधी मोबाईल रिचार्जवर ३ रुपयांचा सुविधा चार्ज लागायचा. याआधी फोन पे आणि पेटीएमने हा निर्णय घेतला होता. त्यांनी आधी सुविधा चार्ज लावला होता. त्यानंतर आता गुगल पेनेदेखील मोठा निर्णय घेतला आहे.

यूपीआय पेमेंटमुळे अनेक गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत. यामुळे डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये नवीन बदल झाले आहेत. यामुळे तुम्ही कधीही आणि कुठेही क्यूआर कोड स्कॅन करुन(buying) पेमेंट करु शकतात. डिजिटल पेमेंटमध्ये भारतात ३७ टक्के वाटा हा गुगल पेचा आहे. लाखो लोक रोज गुगल पेचा वापर करतात. यामुळे कोणतेही काम एका झटक्यात होते. तुम्ही लांब असलेल्या व्यक्तीला एका क्लिकवर पैसे पाठवू शकतात.

हेही वाचा :

वीज ग्राहकांना शॉक! ‘इतक्या’ टक्के दरवाढीची शक्यता

जीवे मारण्याच्या धमकीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “डान्सबार बंद केल्यावर… “

सौरव गांगुलीवर येणार बायोपिक, ‘हा’ अभिनेता साकारणार ‘दादा’ची भूमिका!