मोठी राजकीय उलथापालथ?; ‘हा’ बडा नेता काँग्रेसचा हात सोडणार?

पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला धूळ चारणारे आणि काँग्रेसचे(Congress)नेते रवींद्र धंगेकर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी धंगेकर यांचा पराभव केला. काँग्रेसकडून (Congress) योग्य साथ न मिळाल्याने पराभव झाल्याची भावना धंगेकर यांच्या मनात असून, याच कारणामुळे ते पक्षबदलाचा विचार करत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.
उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यात ‘मिशन टायगर’ जोरदार पद्धतीने होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता धंगेकर यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाची शक्यता अधिकच बळावली आहे.
रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया स्टेटसवर भगवा पंचा परिधान केलेला फोटो शेअर केला आणि त्यासोबत अजय-अतुल यांचे “तेरे क़दमों के तले मिट्टी” हे गाणे लावले. या स्टेटसवरून ते पक्षांतराच्या तयारीत असल्याची शक्यता अधिक गडद झाली आहे. धंगेकर आधीच शिंदे गटाच्या संपर्कात आहेत आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
सध्या शिंदे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळे त्यांच्या दौऱ्यात धंगेकर भेट घेतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धंगेकर विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेतृत्वावर नाराज आहेत. ३० डिसेंबर रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना आणखी जोर मिळाला होता.
हेही वाचा :
वीज ग्राहकांना शॉक! ‘इतक्या’ टक्के दरवाढीची शक्यता
जीवे मारण्याच्या धमकीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “डान्सबार बंद केल्यावर… “
सौरव गांगुलीवर येणार बायोपिक, ‘हा’ अभिनेता साकारणार ‘दादा’ची भूमिका!