लाडक्या बहिणींना होळीचं गिफ्ट! महायुती सरकारचा मोठा निर्णय

काही दिवसांवर होळीचा(holi) सण येवून ठेपलाय. त्याअगोदरच लाडक्या बहि‍णींसाठी एक मोठी खुशखबर आहे. सरकारने लाडक्या बहि‍णींना होळी सणानिमित्त एक मोठं गिफ्ट द्यायचं ठरवलंय. लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने आता लाडक्या बहि‍णींवर लक्ष केंद्रित केलंय. माजी मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी महिलांना परिवहन महामंडळाच्या प्रवासात अर्धे तिकीट देण्याची योजना आणली. त्यानंतर राज्यातील लाडक्या बहि‍णींना दरमहा 1500 रूपये द्यायला सुरूवात केलीय.

राज्यभरातील महिलांनी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला भरभरून मतदान केलंय. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनेही महिलांवर लक्ष केंद्रीत केलंय. होळी सणानिमित्ताने रेशन दुकानातून साड्यांचे वाटप केलं जाणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना या साड्या दिल्या जाणार आहे. यासंदर्भात राज्याच्या पुरवठा विभागाने आदेश काढले आहेत.

महायुती सरकारचा होळी(holi) सणानिमित्त लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारा अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार करण्यात आले. प्रत्येक तालुक्यामधील रेशन दुकानात या साड्या पोहोचवण्यात येणार आहेत. होळीच्या सणापर्यंत प्रत्येक लाभार्थी कुटुंबांला एक साडी दिली जाणार आहे.

लाभार्थी महिलांनी रेशन दुकानात एका कार्डवर एक साडी दिली जाणार आहे. ई-पॉस मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर त्यांना ही साडी मिळणार आहे. राज्याच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे अंत्योदय गटातील शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी दिली जात आहे.

जळगाव जिल्ह्यात 1 लाख 35 हजार 302 महिलांना होळी सणापूर्वीच साडी मिळणार आहे. अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागामधील सर्व रेशन दुकानांवर अंत्योदय कार्डधारकांच्या संख्येनुसार साड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती समोर येतेय. तर होळीला साडी मिळणार असल्यामुळे लाडक्या बहि‍णींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. फक्त साडीचा दर्जा चांगला असावा, अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केलीय.

हेही वाचा :

चाणक्य नीती: ‘या’ ठिकाणी पैसे खर्च केल्यास तिजोरी कधीच रिकामी होत नाही

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

मोहम्मद शामी पुन्हा जखमी? रोहित शर्माच्या अडचणी वाढणार