अखेर पाकिस्तानी खेळाडूने मर्यादा सोडत केली शिवीगाळ; विराटला जीवनदान मिळाल्यानंतर

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्वाधिक हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. विराट कोहलीने(virat kohli) शानदार शतक झळकावत पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. विराटला हरि, रौफच्या चेंडूवर जीवदान मिळाल्यानंतर हरिस रौफचा पारा चांगलाच वाढला आणि मर्यादेची सीमा ओलांडत नसीम शाहला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओसुद्धा चांगलाच व्हायरल होत आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव होता. विराट(virat kohli) कोहलीने त्याच्या ५१ व्या शतकासह पाककडून सामना हिसकावून घेतला. पण सामन्यात एक क्षण असा आला जेव्हा ग्रीन आर्मीला विराटला बाद करण्याची सुवर्णसंधी मिळाली.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांच्या शानदार खेळीमुळे २४१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताची सुरुवात चांगली झाली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी पाकिस्तानी गोलंदाजांविरुद्ध आक्रमक सुरुवात केली. पाचव्या षटकात शाहीन आफ्रिदीने रोहित शर्माला बाद करून पाकिस्तानला मोठे यश मिळवून दिले. परंतु, त्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही.

पाकिस्तानी गोलंदाजांमध्ये हरिस रौफ सर्वात धोकादायक दिसत होता. ११ व्या षटकात विराट कोहलीची विकेट घेण्याची त्याला सुवर्णसंधी होती. रौफच्या चेंडूवर ऑफ स्टंपच्या बाहेर कोहलीने शॉट मारला आणि चेंडू थर्ड मॅनकडे गेला. नसीम शाह थर्ड मॅनच्या सीमेवर क्षेत्ररक्षण करीत होता. त्याच्या जवळ चेंडू पडला परंतु तिथपर्यंत नसीम पोहचू शकला नाही.

नसीम चेंडू पकडण्यासाठी धावण्याऐवजी, त्याने चेंडू थांबवण्याचा निर्णय घेतला. यामुळे हरीस रौफ निराश झाला आणि त्याने रागाच्या भरात नसीम शाहला शिवीगाळ केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली, ज्यामुळे पाकिस्तानी संघातील तणाव स्पष्टपणे उघड झाला. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील राजा आणि प्रिन्स यांनी मिळून ७५ चेंडूत ६९ धावांची भागीदारी करून विजयाचा पाया रचला.

या दरम्यान, १५ धावांचा वैयक्तिक स्कोअर गाठल्यानंतर, विराट १४ हजार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावा करणारा जगातील तिसरा क्रिकेटपटू बनला. श्रेयस आणि विराट यांच्यातील तिसऱ्या विकेटसाठी १२८ चेंडूत ११४ धावांच्या भागीदारीने सामन्याचा निकाल निश्चित केला.

हेही वाचा :

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी!

“अंतर्वस्त्राचे पैसेही…”; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

उर्वशी रौतेला करणार ऑरीशी लग्न? चाहते म्हणाले ‘पुरुषाशी लग्न करणारी पहिली भारतीय स्त्री’

‘उद्धव ठाकरे हा तर टक्कापुरुष’; ज्योती वाघमारेंची उद्धव ठाकरेंवर टीका