लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याही क्षणी फेब्रुवारीचा हप्ता येणार

महायुती सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना राबवली आहे.(installment)लाडकी बहीण योजनेत महिलांना आर्थिक मदत केली जाते. दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लवकरच लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने केलं आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यांपर्यंतचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. महिला आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहे.

फेब्रुवारी महिना संपायला अवघे ३ दिवस उरले आहेत. अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली नाही. दरम्यान, लाखो अपात्र महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.(installment)त्यांना आता यापुढचा हप्ता मिळणार नाही. फेब्रुवारीचा हप्ता लवकर मिळण्याची अपेक्षा महिलांना आहे.

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता अद्यापही मिळालेला नसल्याने महिलांमध्ये नाराजी पसरलेली दिसत आहे. या योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच पैसे दिले जाणार आहेत. परंतु अद्याप पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात हप्ता मिळणार की नाही (installment)अशी भीती महिलांच्या मनात निर्माण झाली आहे.

लाडकी बहीण योजनेत ज्या महिला निकषांमध्ये बसत नाही त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. यामध्ये २१ ते ६५ वयोगटापेक्षा जास्त वयोगटातील महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांना पैसे मिळणार आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना पैसे मिळणार नाही. चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही. या महिलांना आतापासून १५०० रुपये मिळणार नाही.

हेही वाचा :

“अंतर्वस्त्राचे पैसेही…”; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी!

उर्वशी रौतेला करणार ऑरीशी लग्न? चाहते म्हणाले ‘पुरुषाशी लग्न करणारी पहिली भारतीय स्त्री’