सोने-चांदीत मोठी पडझड, किंमती उतरल्या झरझर, असा आहे आजचा दर

बजेट 2025 सोन्याच्या पथ्यावर पडले. अर्थसंकल्प सादर झाल्यापासून (stabilized)किंमती सुसाट झाल्या. तर चांदीत चढउताराचे सत्र आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सोन्याची मोठी घोडदौड सुरू आहे. मध्यंतरी एकदा दरवाढीला ब्रेक लागला होता. गेल्या आठवड्यात सोने दणकावून आपटले होते. तर सोमवार आणि मंगळवारी मौल्यवान धातुत मोठी वाढ झाली होती. त्यानंतर बुधवारी सोन्याचा दर उतरला. चांदीत तर मोठी पडझड झाली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…

गेल्या आठवड्यात सोन्याने उसळली घेतली. तशीच उसळी सोमवार आणि मंगळवारी घेतली. सोमवारी सोने 100 रुपये, मंगळवारी 220 रुपये महागले. तर बुधवारी सोने 270 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,900 650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.सोमवारी चांदीत 500 रूपयांची वाढ झाली होती. मंगळवारी भावात बदल झाला नव्हता. तर बुधवारी 26 फेब्रुवारी (stabilized)रोजी किंमती 3 हजारांनी स्वस्त झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 98,000 रुपये इतका आहे.
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,647, 23 कॅरेट 86,300, 22 कॅरेट सोने 79,369 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,985 रुपये, 14 कॅरेट सोने 50,689 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,769 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा(stabilized) समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
हेही वाचा :
धक्कादायक! शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार..
हार्दिकच्या गर्लफ्रेंडने सगळ्यांसमोर केलं असं काही, पाहा व्हायरल व्हिडीओ!
काय सांगता! शाहरुख खानने ‘मन्नत’ बंगला सोडला ? नेमकं कारण काय ?