सव्वा महिन्यातील बलात्कारांची हादरवणारी आकडेवारी समोर!

पुणे शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चालू वर्षात (past)पहिल्या सव्वा महिन्यातच शहरात विनयभंगाच्या १२५ घटना घडल्या, तर बलात्काराचे ५६ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या बहुतांश घटनांमध्ये आरोपी पीडितेच्या ओळखीचे किंवा नात्यातील असल्याचे समोर आले आहे.स्वारगेट एसटी स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणामुळे शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपीने पीडितेला ‘ताई’ अशी हाक मारून विश्वास संपादन केला आणि नंतर तिचा घात केला

गुन्ह्यांमध्ये ओळखीचे आरोपी :
पोलिसांच्या माहितीनुसार, विनयभंग आणि बलात्कार प्रकरणांमध्ये आरोपी बहुतांश वेळा पीडितेच्या ओळखीचे किंवा नात्यातील असतात. गेल्या वर्षी बोपदेव घाटातघडलेल्या बलात्कार (past) प्रकरणातही हेच दिसून आले. पीडित तरुणी शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावाहून पुण्यात आलेल्या होत्या.
वर्ष निहाय गुन्ह्यांची आकडेवारी २०२३ ते १८ फेब्रुवारी २०२५
प्रकार २०२३ २०२४ २०२५ १८ फेब्रुवारीपर्यंत
विनयभंग ७३८ ८६६ १२५
बलात्कार ४१० ५०५ ५६
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण :
मित्रासोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन (past)तरुणीवर मध्यरात्री तिघांनी सामूहिक बलात्कार केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दहा दिवसांत दोन आरोपींना पकडले, मात्र एक आरोपी अद्याप फरार आहे. विशेष म्हणजे घटनास्थळी मोबाईल किंवा सीसीटीव्ही नव्हते आणि तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार होते.
हेही वाचा :
धक्कादायक! शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार..
हार्दिकच्या गर्लफ्रेंडने सगळ्यांसमोर केलं असं काही, पाहा व्हायरल व्हिडीओ!
काय सांगता! शाहरुख खानने ‘मन्नत’ बंगला सोडला ? नेमकं कारण काय ?