जंक फूडचा मेंदूवर होतोय गंभीर परिणाम; ५ दिवसांतच होतो ‘हा’ मोठा बदल

आपल्या खाण्याच्या सवयींचा मेंदूवर थेट परिणाम होतो. चुकीच्या आहारामुळे(Junk food) मेंदूच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की, केवळ ५ दिवस जंक फूडखाल्ल्याने मेंदूच्या विशिष्ट भागात महत्वाचे बदल होतात. जंक फूड म्हणजे साखर, तेल, चरबी, मीठ आणि जास्त कॅलरीज असलेले पदार्थ. बाजारात मिळणारे चॉकलेट, बिस्किटे, कुरकुरे, वेफर्स, भुजिया, तसेच पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज यांसारखे पदार्थ जंक फूडमध्ये मोडतात.

मेंदूच्या विशिष्ट भागावर परिणाम :
‘नेचर मेटाबॉलिझम’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, जंक फूड खाल्ल्यानंतर मेंदूतील अंतर्गत क्रिया लठ्ठ व्यक्तीच्या मेंदूसारखी होऊ लागते. व्यक्ती लठ्ठ नसली तरीही तिच्या मेंदूत हे बदल दिसून येतात. संशोधनाच्या मुख्य लेखिका आणि न्यूरोसायंटिस्टस्टेफनी कुलमनम्हणतात की, या संशोधनातील निष्कर्ष त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळे होते. जेव्हा एखादी व्यक्ती अन्न खाते, तेव्हा शरीरात इन्सुलिन तयार होते, जे अन्न पचनासाठी मदत करते. सामान्यतः, इन्सुलिन मेंदूपर्यंत पोहोचून खाण्याची इच्छा कमी करते, ज्यामुळे व्यक्तीला पोट भरल्याचा संदेश मिळतो आणि ती खाणे थांबवते. परंतु, लठ्ठ व्यक्तींमध्ये मेंदूची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे शरीर (Junk food)अन्नाची योग्य प्रक्रिया करण्यास असमर्थ ठरते.
या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी स्टेफनी कुलमन यांनी २९ निरोगी पुरुषांवर संशोधन केले. त्यापैकी १८ जणांना जास्त कॅलरीयुक्त जंक फूड देण्यात आले, ज्यात साखर, चरबी आणि मिठाचे प्रमाण अधिक होते. या लोकांना ५ दिवसांपर्यंत दररोज १५०० कॅलरीजचे जंक फूड देण्यात आले, तर उर्वरित लोकांना केवळ १२०० कॅलरीज घेण्यास सांगण्यात आले. संशोधकांनी या व्यक्तींच्या मेंदूतील रक्तप्रवाहाचा अभ्यास केला. पहिल्या चार दिवसांत कोणताही मोठा बदल दिसून आला नाही, परंतु पाचव्या दिवशी मेंदूच्या एका विशिष्ट भागात हालचाल वाढलेली आढळली. हा बदल जंक फूडमुळेचझाल्याचे स्पष्ट झाले.
हा बदल लठ्ठ व्यक्तींमध्ये दिसणाऱ्या इन्सुलिन रेझिस्टन्ससारखाच होता. लठ्ठ व्यक्तींमध्ये अशा स्थितीत टाइप-२ डायबेटिस होण्याचा धोका वाढतो. संशोधनात असेही दिसून आले की, जेव्हा या (Junk food)लोकांनी जंक फूड खाणे बंद केले, तेव्हा त्यांच्या मेंदूतील हा बदल हळूहळू कमी झाला. म्हणजेच, आहारातील बदलांमुळे मेंदूवर होणारा नकारात्मक परिणाम टाळता येऊ शकतो. त्यामुळे, नियमितपणे जंक फूड खाणे टाळल्यास लठ्ठपणा आणि त्याचे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात. संशोधक स्टेफनी कुलमन सांगतात की, जरी या अभ्यासात जास्त प्रमाणात कॅलरीजदेण्यात आल्या असल्या, तरी सुट्ट्यांमध्ये किंवा विशिष्ट प्रसंगी आपण जास्त जंक फूड खातोच. त्यामुळे, या सवयींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
धक्कादायक! शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार..
हार्दिकच्या गर्लफ्रेंडने सगळ्यांसमोर केलं असं काही, पाहा व्हायरल व्हिडीओ!
काय सांगता! शाहरुख खानने ‘मन्नत’ बंगला सोडला ? नेमकं कारण काय ?