30 वर्षांनी सोनाली आणि राज ठाकरे दिसले एकत्र

काल मराठी भाषा गौरव दिनानिमित्त चर्चेत राहिलेला मनसेचा काव्यवाचन (reading)आणि अभिजात पुस्तक प्रदर्शन सोहळा गाजला. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तर मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. सोशल मीडियावर या सोहळ्याचे व्हिडीओ चर्चेत आहेत. त्यातीलच एक व्हिडीओ गाजतोय सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांचा.

मनसेच्या या कार्यक्रमासाठी सोनाली बेंद्रे, विकी कौशल, रितेश देशमुख, अशोक सराफ, नागराज मंजुळे यांनी हजेरी लावली. विकी कौशलने वाचलेली कणा ही कविता वाचली जी सगळ्यांना (reading)आवडली. पण त्याहीपेक्षा सध्या सोशल मीडियावर गाजतोय तो सोनाली आणि राज ठाकरे यांचा एकत्र व्हिडीओ.
तब्बल तीस वर्षानंतर सोनाली आणि राज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर आले. राज सोनालीचं स्वागत करण्यासाठी पुढे आले आणि तिच्याबरोबर ते स्टेजवर गेले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आहे. खूप जुने मित्र असलेले सोनाली आणि राज बऱ्याच काळाने एका कार्यक्रमात एकत्र (reading)दिसले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
1996 साली मायकल जॅक्सन जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आला. तेव्हा सोनालीने त्याच्या स्वागतासाठी राज ठाकरेंबरोबर मुंबई एअरपोर्टवर हजेरी लावली होती. सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.सोनालीनेही या कार्यक्रमात कविता सादर केली. तिच्या कवितेचा व्हिडीओही चर्चेत आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील दत्तात्रय गाडेला बेड्या; मध्यरात्रीच्या थरारानंतर अटक
1 मार्चपासून ‘या’ 3 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, जगतील राजासारखं आयुष्य
जंक फूडचा मेंदूवर होतोय गंभीर परिणाम; ५ दिवसांतच होतो ‘हा’ मोठा बदल