माशाला पाजली दारू अन् मग पुढे काय घडलं???, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर दररोज अनेक विचित्र व्हिडिओ व्हायरल(viral) होत असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती मोठ्या माशाला दारू पाजताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला असून, प्राण्यासोबत असे क्रूर कृत्य कसे केले जाऊ शकते?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

व्हायरल(viral) व्हिडिओमध्ये, दोन व्यक्ती दिसत आहेत. त्यापैकी एकाच्या हातात एक मोठा मासा आहे, तो रोहू प्रजातीचा असावा. तो व्यक्ती एका हाताने मासा पकडतो आणि दुसऱ्या हाताने त्याच्या तोंडात दारू ओततो. धक्कादायक बाब म्हणजे, मासा ती दारू पितो.
हा व्हिडिओ @genuine_laughing_club नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले असून, त्यावर अनेक कमेंट्स येत आहेत. काही लोक या घटनेवर टीका करत आहेत, तर काहीजण याला गंमत म्हणत आहेत.
एका यूजरने लिहिले, “पाण्याशिवाय मासा कसा जिवंत असेल… मला वाटते हा AI जनरेट केलेला व्हिडिओ आहे.” दुसऱ्या यूजरने लिहिले, “कोणी किती निर्दयी असू शकते?” प्राण्यांवरील क्रूरता हा व्हिडिओ म्हणजे प्राण्यांवरील क्रूरतेचे उदाहरण आहे. अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे..
हेही वाचा :
आज अनेक ‘महासंयोग’; ‘या’ 5 राशींवर देवी लक्ष्मी धनाचा वर्षाव करणार!
तर आपण भीकेला लागू वाल्मिक कराडचा तो खळबळजनक फोन कॉल उघड
‘अंखियों से गोली मारे’ वर गोविंदाचा मुलाचा आणि रवीनाच्या लेकीचा VIDEO