धक्कादायक! कतरिना कैफ स्नान करताना तरुणांनी बनवला व्हिडीओ

प्रयागराजमधील महाकुंभाच्या पवित्र पर्वाची सांगता झाली. या काळात देशभरातली कोट्यवधी लोकांनी प्रयागराज येथील संगमावर पवित्र स्नान केले. विशेष म्हणजे या महाकुंभात देशातील प्रसिद्ध लोकांनीही पवित्र स्नान केले. यात बॉलिवुड, उद्योग तसेच इतर क्षेत्राती दिग्गजांचा समावेश आहे. महाकुंभाचे पर्व संपण्याआधी बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ आपल्या सासूसोबत पवित्र स्नान करण्यासाठी गेली होती. मात्र काही लोकांनी तिचा स्नान करतानाचा व्हिडीओ(video) गुपचूप शूट केला आहे. हाच व्हिडीओ सध्या सगळीकडे चर्चेचं कारण बनला आहे.

कतरिना कैफ आपल्या सासूबाईसोबत प्रयागराज येथे पवित्र स्नानासाठी गेली होती. त्यावेळी तिने नदीमध्ये डुबकी घेत स्नान केले. मात्र याच वेळी तिचा एक व्हिडीओ(video) शूट करण्यात आला. ती हात जोडून डुबकी घेत असताना दोन तरुणांनी तिचा एक व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओत दोन तरूण अगोदर स्वत:ला आणि नंतर कतरिना कैफला दाखवताना दिसत आहेत. विशेष म्हणजे कतरिना कैफ स्नान करत असताना या तरुणांनी हा प्रकार केला आहे.
व्हिडीओ शूट करत असताना हे दोन्ही तरूण हसत आहेत. सोबतच ‘हा मी आहे, हा माझा भाऊ आहे आणि मागे आहे कतरिना कैफ’ असे मिश्किल भाष्य करताना हे तरूण दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काही लोकांनी तर या व्हिडीओला पाहून संताप व्यक्त केला आहे. या तरुणांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी काही लोकांनी केली आहे.
हा व्हिडीओ पाहून बॉलिवुडची अभिनेत्री रविना टंडनदेखील संतापली आहे. तिने या व्हिडीओवर कमेंट केली आहे. तुमच्यासारखे लोक अशा पवित्र क्षणाला अपवित्र करून टाकता. असे प्रसंग हे शांततापूर्ण आणि अर्थपूर्ण असायला पाहिजेत. मात्र अशा लोकांमुळे हे क्षण खराब होऊन जातात. हे खूपच चुकीचे आणि वाईट आहे, असे म्हणत तिने व्हिडीओ करणाऱ्या तरुणांना सुनावले आहे.
दरम्यान, महाकुंभामध्ये कतरिना कैफच्या आधी अनेक दिग्गजांनी पवित्र स्नान केले. यात भारतातील मोठे उद्योगपती गौतम अदानी, अंबानी कुटुंबीयांचाही समावेश आहे. बॉलिवुडमधील अनेक कलाकारांनीही कुंभमेळ्यात पवित्र स्नान केले.
हेही वाचा :
कॅन्सरमुळे प्रसिद्ध गायकाचे निधन…
शरद पवारांचा शिलेदार अजितदादांच्या गाडीत, एकत्रित प्रवास अन् राजकीय वर्तुळात चर्चा
मुलाच्या बर्थ डे पार्टीतून गोविंदा गायब; यशवर्धनने आई आणि बहिणीसोबत कापला केक, VIDEO व्हायरल