काँग्रेस महिला नेत्याच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट खळबळजनक माहिती समोर

हरियाणातील काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल हत्या प्रकरणात(information) पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तब्बल ३६ तासांच्या तपासानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी सचिनयाला दिल्लीतून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन हा हिमानीचा मित्र होता आणि तिची हत्या त्याच्याच घरात करण्यात आली. त्यानंतर, मृतदेह सूटकेसमध्ये भरून सांपला बस स्टँडवर टाकून आरोपी फरार झाला होता.

सूटकेसमध्ये मृतदेह :
१ मार्च रोजी रोहतक हायवेवरील सांपला बस स्टँडवर हिमानी नरवालचा मृतदेह आढळला. तो एका सूटकेसमध्ये कोंबलेला होता, आणि मृतदेहाचा चेहरा निळसर पडलेला होता. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू केला.तपासादरम्यान, मृतदेह ८०० मीटर अंतरावरून आणला गेला असल्याचे आढळले. आरोपी सचिनने आपल्या विजयनगर येथील घरात हिमानीची (information) हत्या करून तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला आणि बस स्टँडवर टाकून पळ काढला. पोलिसांनी सचिनचा माग काढत त्याला दिल्लीतून अटक केली आहे.
आरोपी सचिन याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून हिमानीचा मोबाईल आणि दागिने हस्तगत केले आहेत. अद्याप हत्या कशामुळे झाली, याबाबत तपास सुरू आहे. पोलिसांच्या मते, हत्या व्यक्तिगत वादातून झाल्याची शक्यता आहे.हिमानी नरवाल ही हरियाणातील काँग्रेस कार्यकर्ती होती आणि भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींसोबत दिसल्यामुळे चर्चेत आली होती. तिचे वडील आत्महत्या करून निधन पावले होते,(information) तर भाऊही हत्या प्रकरणात मारला गेला होता. ती आपल्या आईसोबत रोहतकच्या विजयनगर भागात राहत होती.परिवारानुसार, हिमानीच्या लग्नासाठी मुलगा शोधण्याची प्रक्रिया सुरू होती. २०२४ मध्ये निवडणुकीत व्यस्त असल्यामुळे तिने २०२५ मध्ये लग्न करण्याचे ठरवले होते. दरम्यान, हरियाणा पोलिस आज या प्रकरणाचा अधिकृत खुलासा करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
कॅन्सरमुळे प्रसिद्ध गायकाचे निधन…
शरद पवारांचा शिलेदार अजितदादांच्या गाडीत, एकत्रित प्रवास अन् राजकीय वर्तुळात चर्चा
मुलाच्या बर्थ डे पार्टीतून गोविंदा गायब; यशवर्धनने आई आणि बहिणीसोबत कापला केक, VIDEO व्हायरल