टीसीएस आणि इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी पगारवाढीवर कंपन्यांचा मोठा निर्णय

भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्या टीसीएस आणि इन्फोसिस (salaries)आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी इन्फोसिसने म्हैसूर कॅम्पसमधील ३००० हून अधिक फ्रेशर्सना कामावरून काढले होते. याविरोधात आयटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आवाज उठवल्यानंतर केंद्राला हस्तक्षेप करावा लागला होता. आता इन्फोसिससोबतच टीसीएसदेखील कर्मचाऱ्यांना धक्का देण्याच्या तयारीत आहे देशातील आयटी क्षेत्र पुन्हा एकदा दबावाखाली असल्याचे दिसत असून, त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावरही दिसून येणार आहे. यापूर्वी कोविड-१९ च्या काळातही आयटी क्षेत्रावर दबाव होता. आता जागतिक अनिश्चिततेमुळे तशीच परिस्थिती निर्माण होत आहे.

किती पगारवाढ मिळणार?

टीसीएस: भारतातील सर्वात मोठी IT सेवा कंपनी टीसीएस यावर्षी ४ ते ८ टक्के पगारवाढ देणार आहे.

इन्फोसिस: देशातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी इन्फोसिस ५ ते ८ टक्के पगारवाढ देणार आहे.  या दोन्ही कंपन्यांमध्ये लाखो कर्मचारी काम करतात, त्यामुळे ही बातमी त्यांच्यासाठी नक्कीच निराशाजनक आहे.

व्हेरिएबल वेतनात कपात

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ऑक्टोबर-डिसेंबर २०२४ साठी कमी तिमाही व्हेरिएबल वेतन जाहीर करण्याची शक्यता आहे. कनिष्ठ आणि मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांना १०० टक्के व्हेरिएबल वेतन मिळेल. वरिष्ठ कर्मचाऱ्यांना २० ते ४० टक्के व्हेरिएबल वेतन मिळू शकते. म्हणजेच वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये (salaries)मोठी कपात होण्याची शक्यता आहे. ४ वर्षांतील सर्वात कमी पगारवाढ नवीन आर्थिक वर्षात टीसीएस कर्मचाऱ्यांची पगारवाढ गेल्या ४ आर्थिक वर्षांतील सर्वात कमी आहे.

FY22: १०.५ टक्के
FY23: ६-९ टक्के
FY24: ७-९ टक्के

डिसेंबर २०२४ च्या तिमाहीत कंपनीने कर्मचाऱ्यांची संख्या ५,३७० ने कमी करून ६,०७,३५४ केली आहे. कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दर तिमाही FY24 मध्ये १३ टक्क्यांपर्यंत वाढला, जो एका वर्षापूर्वी १२.३ टक्के होता. टीसीएस कंपनी पगारवाढीबाबत हात आखडता घेत असली तरी, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा वार्षिक आधारावर ५.५ टक्क्यांनी वाढून १२,३८० कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा महसूलही (salaries)५.६ टक्क्यांनी वाढून ६३,९७३ कोटी रुपये झाला आहे. इन्फोसिसमध्ये ३.२३ लाख कर्मचारी आहेत, ज्यांना यावर्षी ६ ते ८ टक्के पगारवाढीचा लाभ मिळणार आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा ११.४ टक्क्यांनी वाढून ६,८०६ कोटी रुपये झाला आहे.

हेही वाचा :

अभिनेता गोविंदाच्या आयुष्यात सुनिता सोडून अजून दोन बायका….

टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला पराभूत न करताच मिळणार थेट अंतिम फेरीचं तिकीट

पुढील 24 तासांत राज्यात पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा इशारा