जंक फूड खाण्याचा तुमच्या मेंदूवर होतो परिणाम; सत्य ऐकून व्हाल चकीत!

सध्याच्या तरुणाईला जंक फूडपासून जास्त काळ लांब राहता येत नाही. (surprised)त्यांच्या रोजच्या आहारात एक तरी बाहेरुन विकत आणलेला पदार्थ असतो. तर त्यांच्या आवडीच्या पदार्थांमध्ये पिझ्झा, बर्गर, फ्राइज या पदार्थांचा समावेश असतो. याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर होतो. त्याने तुमची विचार करण्याची शक्ती मंदावते. तसेच वागण्यातही खूप बदल होतो. जे लोक जास्त प्रमाणात प्रोस्टेड फूड खातात त्यांना डिमेंशिया होण्याचा जास्त धोका असतो.

WHO च्या मते, जगभरात सगळ्यात जास्त मृत्यू ह्रदयरोगामुळे होतात. त्याचं मुळ कारण म्हणजे खाण्यातले पदार्थ आहे. जीवनशैली हा सुद्धा यातला महत्वाचा मुद्दा आहे. जास्त लोक कामानिमित्त बाहेर असतात. त्यावेळेस त्यांना काही बाहेरचं खाणं हा पर्याय असतो. तसचं अनेक व्यक्तींना कॅफेजमध्ये वेळ घालवायला आवडतो. तिथे जंक फूडचं सेवन हमखास केलं जातं. तर काहींना स्ट्रीट फूड्स आवडतात. त्यात तरुणांचा समावेश जास्त प्रमाणात(surprised)केला जातो. याचा परिणाम तुमच्या शरीरावर कसा होतो? हे आपण जाणून घेऊ.

बुद्धी आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होणारा परिणाम –
जंक फूडमध्ये ट्रांस फॅट आणि शुगरचं प्रमाण जास्त असतं. यािम बुद्धीची क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. याने डिमेंशिया हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

मेंदूच्या रचनेवर होणारा परिणाम
जंक फूडचा परिणाम तुमच्या मेंदूच्या रचनेवर होतो. त्यात असणारे फॅट्स (surprised)आणि शुगर मेंदूच्या हिप्पोकॅम्पंसच्या परिसरावर परिणाम करतात. हा मेदूंचा मेमरी आणि नविन गोष्टी आत्मसाद करण्यासाठी लागणारा महत्वाचा भाग आहे.

न्यूरोट्रांसमीटरवर होणारा परिणाम
न्यूरोट्रांसमीटर हा मेंदूचा महत्वाचा भाग आहे. त्यामध्ये असणाऱ्या लाटा मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना संदेश पाठवण्याचे काम करतात. मात्र जंक फूड खाल्याने डोपामाइनची पातळी वाढते. त्याने व्यक्तीचा स्वभाव किंवा मूड बदलतो. त्याने तु्म्हाला जास्त जंक फूड खाण्याची ईच्छा होते.

हेही वाचा :

ज्याची भीती होती तेच झालं, बाबा वेंगांची पहिली भविष्यवाणी झाली खरी

सोशल मीडियावर तरुणीशी फ्लर्ट करतोय आर.माधवन?

महिला दिनी लाडक्या बहि‍णींना खुशखबर! ८ तारखेला ३००० रुपये देणार

लाडक्या बहि‍णींच्या खात्यात फेब्रुवारी- मार्चचे पैसे कधी येणार? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली