सेमी फायनलवेळी पाऊस पडला तर हा संघ थेट फायनलमध्ये पोहचणार

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अंतिम टप्प्यात आली असून, उपांत्य (advance)फेरीचे सामने रंगणार आहेत. आज, 4 मार्च रोजी दुबईत पहिल्या उपांत्य सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येतील, तर उद्या लाहोरमध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका भिडतील. याआधी या स्पर्धेत तीन सामन्यांना पावसाचा फटका बसला आहे, त्यामुळे उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यांवरही पावसाचा प्रभाव पडला तर काय होईल, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

गट फेरीत पावसामुळे सामने रद्द झाल्यावर दोन्ही संघांना समान गुण देण्यात आले होते. मात्र, उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. भारतीय संघाने गट फेरीतील तिन्ही सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. त्यांनी बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला पराभूत केले आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा (advance)पराभव केला, तर दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्धचे त्यांचे सामने पावसामुळे रद्द झाले होते.

जर उपांत्य फेरीतील सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही, तर तो राखीव दिवशी जिथे थांबला होता तिथून पुढे सुरू होईल. मात्र, राखीव दिवशीही सामना पूर्ण न झाल्यास गट फेरीत अव्वल स्थानी असलेल्या संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळेल. यामुळे, भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना फायदा होऊ शकतो, कारण ते गट फेरीत पहिल्या क्रमांकावर होते.लाहोरमध्ये पावसाची शक्यता असल्याने, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यावरही परिणाम होऊ शकतो. जर सामना राखीव दिवशी पूर्ण होऊ शकला नाही, तर दक्षिण Vआफ्रिका अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल, कारण ते ब गटात अव्वल स्थानी होते. त्यामुळे न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान असणार आहे.

याशिवाय बाद फेरीत डकवर्थ-लुईस नियम लागू केला जाईल. यानुसार, जर सामना पावसामुळे अर्धवट राहिला, तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला किमान 25 षटके खेळावे लागतील, अन्यथा सामना पूर्ण झाल्याचे मानले जाणार नाही. त्यामुळे पावसाचा सामना होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी खेळणाऱ्या संघांना सावध खेळ करावा लागणार आहे.

हेही वाचा :

ज्याची भीती होती तेच झालं, बाबा वेंगांची पहिली भविष्यवाणी झाली खरी

सोशल मीडियावर तरुणीशी फ्लर्ट करतोय आर.माधवन?

महिला दिनी लाडक्या बहि‍णींना खुशखबर! ८ तारखेला ३००० रुपये देणार

लाडक्या बहि‍णींच्या खात्यात फेब्रुवारी- मार्चचे पैसे कधी येणार? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली