कराड गँगच्या अमानवीय क्रूरतेचा आणखी एक मोठा पुरावा समोर!

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना कराड गँगने अमानवीयपणे (proof)मारहाण केली. या मारहाणीचे धक्कादायक फोटो सीआयडीच्या चार्जशीटमधून उघड झाले असून, ते पाहून कोणाचंही हृदय पिळवटू शकते. हत्यारांच्या वापराने आणि क्रूरतेने संतोष देशमुख यांच्यावर केलेली मारहाण अकल्पनीय आहे. त्यांना केवळ अंतर्वस्त्रात ठेवून पाईपचे १५ तुकडे पाडून त्यांच्यावर अत्याचार केले गेले.संतोष देशमुख यांच्या अंगावर व पाठीवर गंभीर जखमा दिसून येत आहेत. या अत्याचाराच्या दरम्यान, संतोष देशमुख यांना अर्धमेल्या अवस्थेत ठेऊन आरोपींनी सेल्फी आणि व्हिडिओ काढले आहेत.या कृत्यामुळे आरोपींची राक्षसी मानसिकता आता स्पष्ट झाली आहे. मारहाणीच्या नंतर, त्यांनी त्यांच्याबरोबर(proof) फोटो घेतले असून, त्यात आरोपींचे शहाणपण नसलेले हसू स्पष्टपणे दिसून येते.

संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपींनी पाईपचा वापर केला. प्रतीक आणि सुदर्शन घुले यांच्याद्वारे पाईपने ही भयंकर मारहाण करण्यात आली होती. पाईपचे तुकडे इतके मोठे होते की, त्याचे तब्बल १५ तुकडे पाडले गेले. सीआयडीने घटनास्थळावरून पाईपचे तुकडे गोळा करून ते चार्जशीटमध्ये पुरावा म्हणून जोडले आहेत.घटनास्थळी मारहाण करताना केवळ सुदर्शन घुलेच नाही तर जयराम चाटे महेश केदार या(proof) सगळ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये मारहाणीचे व्हिडीओ काढले आहेत. एकूण 25 व्हिडिओ असल्याचा दावा आहे. तपासाच्या सुरुवातीला व्हिडीओ हाती लागत नसल्याने मोठी अडचण येत होती. आरोपींना कोर्टात हजर केल्यावर विशेषता वाल्मिक कराडला मकोका का लावला? याचे काय पुरावे न्यायालयात
विचारणा केली गेली.
हेही वाचा :
ज्याची भीती होती तेच झालं, बाबा वेंगांची पहिली भविष्यवाणी झाली खरी
सोशल मीडियावर तरुणीशी फ्लर्ट करतोय आर.माधवन?
महिला दिनी लाडक्या बहिणींना खुशखबर! ८ तारखेला ३००० रुपये देणार
लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी- मार्चचे पैसे कधी येणार? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली