लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी बातमी!

लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण (Yojana)योजनेत महिलांना ७ मार्च रोजी फेब्रुवारी- मार्चचा हप्ता जमा केला जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे. महिला दिनाच्या आधी महिलांना पैसे दिले जाणार आहेत. त्यामुळे महिलांच्या खात्यात ७ मार्चपर्यंत ३००० रुपये जमा होणार आहेत.

लाडकी बहीण योजनेत ९ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या महिलांना आता पुढचा हप्ता मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेत निकषात न बसणाऱ्या महिलांची पडताळणी सुरु झाली आहे. जानेवारीत ५ लाख महिलांचे अर्ज बाद केलेत तर फेब्रुवारीत ४ लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. (Yojana)याचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.लाडकी बहीण योजनेत मार्च महिन्यात तब्बल अडीच कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं आदिती तटकरेंनी सांगितलं आहे. त्यामुळे अडीच कोटी महिलांना पैसे मिळणार आहे. फक्त ज्या महिला अपात्र आहेत त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत.
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. एकूण ५ टप्प्यांमध्ये ही पडताळणी होणार आहे. यात ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्यांना पैसे मिळणार (Yojana)नाहीत. तसेच ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य कर भरतात त्यांनाही पैसे मिळणार नाहीत. महिला जर सरकारी नोकरी करत असतील तर त्यांना पैसे मिळणार नाही.तसेच ज्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्या कुटुंबातील महिलांना पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्यांना या महिन्यापासून पैसे मिळणार नाहीत.
हेही वाचा :
सेमी फायनलवेळी पाऊस पडला तर हा संघ थेट फायनलमध्ये पोहचणार
कराड गँगच्या अमानवीय क्रूरतेचा आणखी एक मोठा पुरावा समोर!
बाबा वेंगाची नवीन भविष्यवाणी थक करणारी….