BSNL होळी धमाका ऑफर कंपनीच्या या प्लॅनसह तुम्हाला मोफत मिळणार 30 दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडीटी

भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएल युजर्ससाठी एक आनंदाची बातमी (Limited)आहे. कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी होळी धमाका ऑफर सुरु केली आहे. बार्सिलोनामध्ये सुरु असलेल्या मोबाइल वर्ल्ड कांग्रेस 2025 मध्ये बीएसएनएलने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन ऑफर सुरु केली आहे. ही ऑफर युजर्सच्या फायद्याची आहे. बीएसएनएलची होळी धमाका ऑफर अशी आहे की, कंपनीने त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या व्हॅलिडीटीमध्ये एका महिन्याची वाढ केली आहे. सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे यासाठी युजर्सना कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

बीएसएनएल युजर्ससाठी आनंदाची बातमी
बीएसएनएलचे सध्या 9 कोटींहून अधिक युजर्स आहेत. या युजर्ससाठी कंपनी नेहमीच नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. खरं तर बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन इतर कंपन्यांचे तुलनेत खूप कमी किंमतीचे असतात. त्यामुळे खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅनसोबत तुलना केली तर बीएसएनएलच्या रिचार्ज प्लॅनची किंमत परवडणारी असते. स्वस्त रिचार्ज प्लॅनसोबतच कंपन्या त्यांच्या युजर्सना अनेक फायदे देखील ऑफर करतात. आता देखील कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन ऑफर आणली आहे.

BSNL होळी धमाका ऑफर
ही नवीन ऑफर होळीनिमित्त सादर करण्यात आली आहे. ही (Limited)नवीन ऑफर युजर्सच्या फायद्याची आहे. बीएसएनएलने मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये त्यांच्या 9 कोटींहून अधिक युजर्ससाठी होळी धमाका ऑफर सादर केली आहे. या ऑफर अंतर्गत, कंपनीने रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी एका महिन्याने वाढवण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 30 दिवसांची व्हॅलिडीटी मोफत देत आहे. बीएसएनएलला आशा आहे की या निर्णयामुळे त्यांच्या ग्राहकांची संख्या वाढेल.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली होती. यावेळी बीएसएनएल त्यांच्या ग्राहकांना परवडणारे आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत होता. त्या काळात देखील बीएसएनएल युजर्सची संख्या झपाट्याने वाढली होती.

या रिचार्ज प्लॅनवर मिळतेय ऑफर
खरंतर, बीएसएनएल आता त्यांच्या 2399 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसह(Limited) 30 दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिटी देत आहे. पूर्वी, हा प्लॅन 395 दिवसांची व्हॅलिडिटी देत होता. पण आता त्याची एकूण व्हॅलिडिटी 425 दिवस आहे. बीएसएनएल प्रीपेड प्लॅनमध्ये संपूर्ण भारतात अमर्यादित कॉलिंग, दिल्ली-मुंबईमध्ये एमटीएनएल नेटवर्कवर मोफत रोमिंग आणि मोफत कॉलिंगचा समावेश आहे. यासोबतच, या बीएसएनएल प्लॅनमध्ये 60 जीबी डेटा देखील पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे.

100 एसएमएस मोफत
या प्लॅनच्या युजर्सना दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा आणि 100 मोफत एसएमएस संदेश मिळतील, जे एकूण 850 जीबी डेटाच्या समान आहे. याशिवाय, बीएसएनएल सर्व मोबाइल यूजर्सना BiTV चे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. ते अनेक OTT एप्लिकेशनना मोफत प्रवेश देखील देत आहे.

देशभरात 100,000 4G टॉवर बसवणार
बीएसएनएल त्यांच्या सेवा आणखी चांगल्या करण्यासाठी, बीएसएनएल त्यांच्या नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरवर देखील काम करत आहे. कंपनीची योजना वर्षाच्या पहिल्या सहामाहीपर्यंत देशभरात 100,000 नवीन 4G टॉवर बसवणार आहे. गेल्या एका वर्षात, बीएसएनएल सर्व दूरसंचार मंडळांमध्ये सक्रियपणे त्यांचे नेटवर्क अपग्रेड करत आहे, 65,000 हून अधिक 4G मोबाइल टॉवर आधीच कार्यरत आहेत. उर्वरित टॉवर्स येत्या काही महिन्यांत ऑनलाइन येण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना आणखी चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल.

हेही वाचा :

सेमी फायनलवेळी पाऊस पडला तर हा संघ थेट फायनलमध्ये पोहचणार

कराड गँगच्या अमानवीय क्रूरतेचा आणखी एक मोठा पुरावा समोर!

बाबा वेंगाची नवीन भविष्यवाणी थक करणारी….