संतोष देशमुखांचे फोटो पाहून युवकाने केली आत्महत्या कुटुंबीयांना मोठा धक्का

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर(shock) आल्यानंतर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना हे फोटो आणि व्हिडिओ पुराव्याच्या स्वरूपात सादर केले. त्यानंतर माध्यमांमध्ये ते फोटो झळकल्यावर बीडमधील केज तालुक्यातील जाणेगाव येथील एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

भावनेच्या आहारी जाऊन युवकाचा टोकाचा निर्णय :
केज तालुक्यातील जाणेगाव येथील अशोक हरिभाऊ शिंदे वय 23 या तरुणाने संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे फोटो पाहून आत्महत्या केली. संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर केज येथे बंद पुकारण्यात आला होता, त्यात अशोक शिंदे यांनीही सहभाग घेतला होता. बंदनंतर घरी परतल्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी अशोक शिंदे यांनी पुण्यात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीला, अश्विनी माने हिला फोन केला. या फोनमध्ये त्यांनी आपल्या मनातील अस्वस्थता व्यक्त करत, “मला टोकाचा पाऊल (shock)उचलावसं वाटत आहे,” असे म्हटले. बहिणीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र अशोक यांनी मंगळवारी संध्याकाळी आपले जीवन संपवले.

या दुर्दैवी घटनेनंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जाणेगाव येथे जाऊन अशोक शिंदे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांनी सांगितले की, “संतोष भैय्यांचे फोटो पाहिल्यावर अशोक भावना विवश झाले आणि नैराश्यात गेले. कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये. दोषींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण एकत्र राहिले पाहिजे.”

अशोक शिंदे यांच्या कुटुंबीयांनी या घटनेमुळे मोठा धक्का बसल्याचे सांगितले. त्यांच्या भावाने, शिवराज शिंदे यांनी सांगितले की, “माझ्याकडे अशोकचा कॉल आला होता, पण मी कामात (shock)असल्यामुळे उचलू शकलो नाही. नंतर दुसऱ्यांदा कॉल आला तेव्हा तो गळफास घेतल्याची बातमी मिळाली.”त्याचप्रमाणे, बहिणीने सांगितले की, “तो रडत होता, संतोष देशमुख सरांचे फोटो बघून त्याला खूप वाईट वाटले. मी त्याला समजावले, पण त्याने फोन बंद केला आणि आम्हाला काही कळायच्या आत तो निघून गेला.”

हेही वाचा :

सेमी फायनलवेळी पाऊस पडला तर हा संघ थेट फायनलमध्ये पोहचणार

कराड गँगच्या अमानवीय क्रूरतेचा आणखी एक मोठा पुरावा समोर!

बाबा वेंगाची नवीन भविष्यवाणी थक करणारी….