कडकडत्या उन्हात प्रवाशांचे होणार हाल, ST कर्मचारी जाणार संपावर?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांच्या(ST employees) विविध आर्थिक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी राज्यभरात एसटी आगार विभागाच्या मुख्य ठिकाणी आंदोलन केलं. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल एसटी महामंडळ आणि राज्य सरकारने न घेतल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने दिला आहे. त्यामुळे ऐन होळीत एसटी प्रवशांचा प्रवास रखडणार आहे.

होळीच्या सणात एसटी कर्मचारी(ST employees) संपावर जाण्याची शक्यता असल्यामुळे होळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांना प्रवास करण्यासाठी अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. ऐन होळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या या निर्णयामुळे आता एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.
एसटी कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर लागू आहे. महागाई भत्याची 2018 पासूनची थकबाकी प्रलंबित आहे. न्यायालयाने थकबाकी देण्याबाबतचा निर्णय दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आता महागाई भत्ता 53 टक्के लागू केला आहे. त्यामुळे महागाई भत्ता थकबाकी ही फेब्रुवारी 2025 मधील देय वेतनात देण्यात आले आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप 43 टक्के महागाई भत्ता देण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.

त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 53 टक्के महागाई भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना देखील देण्यात यावा. यासोबतच एप्रिल 2016 ते 2021 पर्यंतचे घरभाडे आणि वार्षिक वेतनवाढीची थकबाकी प्रलंबित आहे ते देखील देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, जाचक शिस्त आणि आवेदन कार्यपद्धती रद्द करा. तसेच एसटी चालकांचा दोष नसताना देखील आरटीओ विभागाकडून करण्यात आलेली दंडात्मक कारवाई देखील रद्द करण्याची मागणी ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली आहे.
हेही वाचा :
दुपारच्या जेवणानंतर किमान १०० पावलं चालणं आरोग्यासाठी भारी
सोन्यात तुफान, चांदीचे तळ्यातमळ्यात, आता किंमती काय?
शरीर सुखाची मागणी, नकार देताच कटरने सपासप वार; 19 वर्षीय नराधमाचं अंगावर काटा आणणारं कृत्य