भरधाव वेगात बाईक चालवत तरुणाचा स्टंट; चारचाकील धडकला अन्…; Video Viral

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडे स्टंट करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी, लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक असे स्टंट(stunt) करतात की यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. यासोबतच ते इतरांचाही जीव धोक्यात आणतात.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण भरधाव वेगात बाईक चालवत स्टंट(stunt) करत असून त्याला हा स्टंट चांगलाच महागात पडला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरुन काही बाईकर्स वेगाने जात आहेत. यातील एकजण बाईकचे पुढेच चाक उचलून स्टंट करत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी सुरु आहे. तसेच पायी जाणारे लोकही पाहायला मिळत आहे.
याचवेळी हे बाईकर्स भरधाव वेगात जात असतात. यातील एक बाईकर अचानक पुढे जाऊन एका चारचाकील धडकतो. त्यानंतर जे घडते ते अंगावर काटा आणणारे आहे. चारचाकील धडकल्यावर बाईक हवेत उडून खाली आदळते. बाईकचे तुकडे तुकडे होतात. त्यापाठोपाठ आणखी दोन बाईक्स देखील खाली पडतात. हे दृश्य पाहणारे आसपासचे लोक त्या तरुणाला वाचवायला जातात. व्हिडिओच्या शेवटी दिसत आहे की, अनेक लोक जमा झाले असून बाईकमधून धूर निघत आहे, तसेच तरुणाला देखील गंभीर दुखापत झाली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @crazyclipsonly या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडिओ परेशातील असल्याचे लोकांच्या पेहराव्यावरुन लक्षात येते. सध्या हा व्हिडिओ प्रकंड वेगाने व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी आपलया प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
Biker drives recklessly in traffic and finds out pic.twitter.com/MnUfGQu0iy
— Crazy Clips (@crazyclipsonly) October 6, 2024
एका युजरने, अति घाई संकटात नेई असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने अशा घटनांमधून लोकांनी आपल्या चुका लक्षात घेतल्या पाहिजेत. आणखी एकाने म्हटले आहे की, नक्कीच छपरी असणार हा. मात्र या व्हायरल व्हिडिओतून हे लक्षात घेण्यासारखे आहे की, आपल्या निष्काळजीपमामुळे आपला जीव धोक्यात येउ शकतो. यामुळे वाहतूक नियमांचे पालन करणे आणि अशा प्रकारचे स्टंट न करणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा :
12 वीच्या उत्तरपत्रिका सापडल्या रस्त्यावर; शिक्षण मंडळाच्या नियमांचे तीन तेरा
घटस्फोटानंतर सानिया मिर्झाच्या आयुष्यातही झाली मिस्ट्री बॉयची एंट्री?, ‘लव्ह लेटर’ आलं समोर
कडकडत्या उन्हात प्रवाशांचे होणार हाल, ST कर्मचारी जाणार संपावर?