असं काय होतं बिलात? पोटभर जेवला अन् बिल पाहताच आला हार्ट अटॅकचा झटका Video

देशभरात हृदयविकाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हृदयविकाराच्या झटक्याची ही भीती आता फक्त वयोवृद्धांमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही चिंतेचा विषय बनली आहे. दरम्यान, राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातून यासंबंधीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे(Video).

यात एका व्यक्तीला रेस्टॉरंटमध्येच आपला जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे हा व्यक्ती रेस्टॉरंटमध्ये जातो, पोटभर खातो आणि बिल भरण्याच्या वेळीच त्याला अचानक हृदयविकाराचा झटका येतो. या भीषण घटनेचे सीसीटिव्ही फुटेज(Video) आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे, जे वेगाने व्हायरल होत आहे. लोक यातील दृश्ये पाहून अक्षरश: हादरली आहेत.

ही हृदयद्रावक घटना राजसमंद येथील एका रेस्टॉरंटमध्ये घडली, जिथे नगर परिषदेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणारा 27 वर्षीय सचिन जेवायला गेला होता. जेवण झाल्यानंतर तो पैसे देण्यासाठी काउंटरवर पोहोचला तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्याने त्याला बिल दिले. बिल पाहिल्यानंतर सचिनने पर्समधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला मात्र यादरम्यान तो अचानक काउंटरवर पडला. हे दृश्य पाहून रेस्टॉरंटमध्ये एकच गोंधळ उडाला. ही संपूर्ण घटना तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

रेस्टॉरंटमध्ये सचिन अचानक कोसळल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी आणि लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सचिनचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना आता चर्चेचा विषय बनली असून सोशल मीडियावर तरुणाच्या मृत्यूचा थरार वेगाने व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या घटनेचा व्हिडिओ @RohitMishra2024 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कोविडच्या वॅक्सिनमुळे हे होत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजकाल अनेकांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होत आहे. सरकारनं यावर पावलं उचलली पाहिजेत”.

हेही वाचा :

अलर्ट! मेसेजवर क्लिक करताच शेतकऱ्यांचे पैसे गायब

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता

भरधाव वेगात बाईक चालवत तरुणाचा स्टंट; चारचाकील धडकला अन्…; Video Viral