पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या! राज्यात एकाचवेळी घेण्यात येणार वार्षिक परीक्षा

राज्यामध्ये पहिली ते नववीच्या परीक्षा शाळास्तरावर घेतल्या जात होत्या. त्यामुळे, शाळांकडे परीक्षेच्या(students) वेळापत्रकाचे नियोजन करण्याचा पूर्ण अधिकार होता. अशा पद्धतीने गेले वर्षोनुवर्षे अशी परंपरा चालत आली आहे. परंतु, यामध्ये काही बदल करण्यात आले आहे.

राज्य शासनाने या संबंधित महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे की राज्यात पहिली ते नववीवर्गांसाठी एकाच वेळी परीक्षा घेण्यात येतील. राज्य शासन परीक्षेच्या(students) तारखा जाहीर करणार आहे. शालेय प्रशासनांना त्या तारखा मान्य करून, त्या त्या दिवशी परीक्षेचे आयोजन करावे लागणार आहे. राज्यात ८ एप्रिलपासून परीक्षेला सुरुवात करण्यात येणार आहे, तर २५ एप्रिलपर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी वेळापत्रक तयार केले आहे. हे वेळापत्रक शाळांच्या वार्षिक परीक्षेसाठी आहे. राज्यातील प्रत्येक शाळेला या वेळापत्रकाचे पालन करावे लागणार आहे. जर काही अडचणी आणल्यास शाळा प्रशासनाला वेळापत्रकात बदल करण्याची गरज भासल्यास स्थानिक जिल्हा शिक्षणअधिकाऱ्यांशी किंवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांशी चर्चा करण्यात यावी आणि या समस्येचे समाधान करावे.

८ एप्रिल २०२५ ते २५ एप्रिल २०२५ या तारखांदरम्यान या परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच १ मे २०२५ रोजी या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. २५ एप्रिल ते १ मे पर्यंतची वेळ पेपर तपासणीसाठी मिळणार आहे. तसेच २ मेपासून उन्हळ्याची सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे.
महत्वाचे म्हणजे ज्या दिवशी त्या विषयाची परीक्षा असेल, त्याच दिवशी त्या विषय संबंधित प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा घेण्यात येईल. जर मुलांचा पट जास्त असल्यामुळे एकाच दिवसात सगळ्यांचे प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा पार पडली नाही तर दुसऱ्या दिवशी किंवा उपल्बध वेळेनुसार घेण्यात यावी. तरी वेळापत्रकानुसार त्या त्या परीक्षेचे नियोजन करण्यात यावे अशी सूचना शिक्षण विभागाने जाहीर केली आहे.
हेही वाचा :
झोपलेल्या लेकीवर बापाची वाईट नजर, आईला जाग आली तेव्हा…’ संतापजनक प्रकार समोर!
असं काय होतं बिलात? पोटभर जेवला अन् बिल पाहताच आला हार्ट अटॅकचा झटका Video
अलर्ट! मेसेजवर क्लिक करताच शेतकऱ्यांचे पैसे गायब