देशमुखांच्या हत्येचा कट कुठे आणि कसा शिजला साक्षीदारांच्या जबाबातून स्पष्ट

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या (conspiracy)ताब्यात आहेत. त्यातील एक आरोरी कृष्णा आंधळे हा फरार आहे. मात्र बाकी आरोपींच्या भोवती कारवाईचा फास आवळला जात आहे. या प्रकरणातील अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागेल आहेत. यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांचे जवाब महत्त्वाचे ठरले. ज्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट कसा कुठे आणि कधी रचला हे स्पष्ट झाले. तसेच वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले त्याच्या टोळीची दहशत कशी आहे हे देखील या जवाबमधून स्पष्ट झाले आहे.

देशमुख हत्या प्रकरणात पाच साक्षीदारांचे जबाब महत्त्वपूर्ण ठरले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पाचही गोपनीय साक्षीदारांची नावे तपासी यंत्रणांनी समोर आणली नाहीत. मात्र त्यांचा जबाब समोर आला आहे. संतोष देशमुख खाते प्रकरणात हा जवाब मैलाचा दगड ठरणार आहे.
गोपनीय साक्षीदार क्रमांक 1
तिरंगा हॉटेलवर जेवण करताना हा साक्षीदार सोबत होता.आरोपींमधल्या (conspiracy)संभाषणाची माहिती साक्षीदाराकडून उघड झाली आहे.
गोपनीय साक्षीदार क्रमांक 2
6 डिसेंबरला आवादा कंपनीतील मारहाण आणि खंडणीच्या धमकीविषयी साक्षीदाराने जबाब दिला आहे.
गोपनीय साक्षीदार क्रमांक 3
वर्चस्वासाठी कराड खंडणी मागतो आणि न दिल्यास अपहरण किंवा मारहाण करत असल्याचा जबाब देण्यात आला आहे. कराडच्या अटकेनंतर आंदोलन करणारे त्याच्या टोळीतीलच असल्याचीही साक्ष त्यांच्याकडून देण्यात आली आहे.
गोपनीय साक्षीदार क्रमांक 4
बापू आंधळे हत्या प्रकरणात कराडच्या सांगण्यावरुन आपल्याला (conspiracy)विनाकारण अडकवल्याचा साक्षीदाराचा जबाब आहे. कराडच्या सांगण्यावरुन पोलीस खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा जबाब देण्यात आला. दहशतीमुळे अनेक जण तक्रार करण्याची हिंमत करत नसल्याचे साक्षीदाराने म्हटले आहे.
गोपनीय साक्षीदार क्रमांक 5
प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे हे सुदर्शन घुलेला भाऊ मानायचे. तिघांची परिसरात मोठी दहशत माजवली होती. तिघेही कराडच्या सांगण्यावरुन खंडणी गोळा करायचे असेही साक्षीदाराने सांगितले.
हेही वाचा :
असं काय होतं बिलात? पोटभर जेवला अन् बिल पाहताच आला हार्ट अटॅकचा झटका Video
झोपलेल्या लेकीवर बापाची वाईट नजर, आईला जाग आली तेव्हा…’ संतापजनक प्रकार समोर!
पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या! राज्यात एकाचवेळी घेण्यात येणार वार्षिक परीक्षा