रीलसाठी चिमुकलीचा जीव घेणार का? पालकांनीच हद्द केली पार VIDEO VIRAL

सध्याचे योग्य हे सोशल मीडियाचे युग आहे असे म्हटलं तरी वावगं ठरणार (parents)नाही. आजकाल प्रत्येक लहानातली लहान गोष्ट इंटरनेटवर शेअर केली जाते. लोक स्वतःला व्हायरल करण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ पाहतात. दररोज इथे हजारो व्हिडिओ शेअर होतात ज्यातील काही लोकांचे लक्ष वेधून घेतात आणि म्हणूनच कमी काळात ते व्हायरल होतात. यात कधी स्टंट्स करून दाखवले जातात तर कधी जुगाड. आता तर लहान मुलेही यात तरबेज झाली आहेत, मोठ्यांचीच काय तर लहानांचेही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मुलांच्या या व्हिडिओमध्ये त्यांचा पालकांचाही मोठा हाथ असतो. चिमुकल्यांचे गोंडस प्रकार पाहून युजर्स त्यांच्यावर भाळतात आणि असे व्हिडिओ वेगाने शेअर होतात. हेच कारण आहे की, आजकाल पालक शुल्लक फेमसाठी आपल्या लहान मुलांचे व्हिडिओ तयार करून त्यांच्याकडून नको नको ते करून घेतात. (parents)अनेकदा या रीलसाठी पालक आपल्या मुलांच्या जिवाचीही पर्वा करत नाहीत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात पालकांच्या चुकीमुळे चिमुकलीचा जीव टांगणीला लागल्याचे दिसून आले. व्हिडिओतील दृश्ये पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, एक चिमुकली मंदिराच्या पायऱ्यांवरून खाली उतरत आहे. यावेळी त्या दगडी पायऱ्या इतक्या लांब असतात की चिमुकलीला त्यावरून नीट खाली उतरता येत नाही. तो दचकत दचकत पायऱ्यांवरून कशीबशी खाली उतरण्याचा प्रयत्न करते. यावेळी तिचे पालक मागून तिचा व्हिडिओ शूट करत असतात. आपल्या मुलीला होणारा त्रास त्यांना दिसत नाही आणि मग शेवटी नको तेच घडते. पुढच्याच क्षणी चिमुकलीचा तोल ढासळतो आणि ती खाली घरंगळत खाली पडू लागते. सुदैवाने यावेळी खाली एक आजोबा (parents)वर चढत असतात जे चिमुकलीला खाली पडत असल्याचे पाहतात आणि तिला आपल्या हाताने तिला पकडतात. विशेष म्हणजे याक्षणीही मुलीचे पालक मागून तिचा व्हिडिओ शूट करत असतात, जे पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. युजर्स आता पालकांवर भडकले असून व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

हा व्हायरल व्हिडिओ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो युजर्सने पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “लोक रिल बनवण्यासाठी पागल झाले आहेत…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खुपच निष्काळजीपणा…… त्या लहानश्या जीवाला किंती लागलं असेल, वरून रील बनवून पोस्ट पण गेली….”.

हेही वाचा :

असं काय होतं बिलात? पोटभर जेवला अन् बिल पाहताच आला हार्ट अटॅकचा झटका Video

झोपलेल्या लेकीवर बापाची वाईट नजर, आईला जाग आली तेव्हा…’ संतापजनक प्रकार समोर!

पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या! राज्यात एकाचवेळी घेण्यात येणार वार्षिक परीक्षा