‘जब वी मेट’, शाहिदने सगळ्यांसमोर करीनाला मारली मिठी, व्हिडीओ तुफान व्हायरल

बॉलिवूडमधील(Bollywood) सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या प्रेमकथांपैकी एक म्हणजे शाहिद कपूर आणि करीना कपूर यांचे नाते. एक काळ होता जेव्हा हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. चाहत्यांनाही त्यांची जोडी प्रचंड आवडायची. ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये करीनाने खुलेपणाने शाहिदवरील प्रेमाची कबुली दिली होती.

मात्र, काही वर्षांनंतर त्यांचे अचानक ब्रेकअप झाले आणि बॉलिवूडमध्ये(Bollywood) त्यांच्या वेगळ्या होण्याच्या चर्चा रंगल्या. आता मात्र अनेक वर्षांनंतर दोघे पुन्हा जवळ आले असून, त्यांच्या गळाभेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
शाहिद आणि करीना दोघेही आता आपल्या वैयक्तिक आयुष्यात स्थिरस्थावर झाले आहेत आणि आपल्या कुटुंबासह आनंदी जीवन जगत आहेत. याआधीही ते अनेकदा समोरासमोर आले, अगदी ‘उडता पंजाब’ या चित्रपटाच्या प्रमोशनवेळीही. मात्र, त्यावेळी दोघांचे एकमेकांसोबत कोणतेही सीन नव्हते आणि त्यांनी फक्त प्रोफेशनल पातळीवर संवाद साधला होता.

मात्र, नुकत्याच पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्याआधीच्या प्रेस कॉन्फरन्सदरम्यान, शाहिद आणि करीना पुन्हा एकत्र आले. दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि मनसोक्त गप्पाही मारल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, चाहत्यांनी त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शाहिद आणि करिनाची सर्वात गाजलेली जोडी ‘जब वी मेट’ चित्रपटातून चाहत्यांच्या मनात कोरली गेली. आजही लोक त्यांना ‘गीत’ आणि ‘आदित्य’ या त्यांच्या चित्रपटातील व्यक्तिरेखांमुळे ओळखतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कमेंट्समध्ये ‘गीत आणि आदित्य पुन्हा एकत्र आले!’ असे लिहिले आहे.
विशेष म्हणजे, ब्रेकअपनंतरही शाहिद आणि करीनाने ‘जब वी मेट’ चित्रपट एकत्र पूर्ण केला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा दोघांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :
महिला दिनी हादरवून सोडणारी घटना समोर; हम्पीमध्ये परदेशी महिलेवर बलात्कार
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर चाहत्यांचे होणार स्वप्नभंग; रोहित शर्मा करणार ‘या’ गोष्टीला अलविदा..
मराठी माणसावर प्ररप्रांतीय महिलांचा जीवघेणा हल्ला, ‘डोक्यात फरशी मारुन…’