भारताला फायनलपूर्वी मिळाली गुड न्यूज, संंघात झाली या खास व्यक्तीची एंट्री

दुबई : चॅम्पियन्य ट्रॉफीच्या फायनलपूर्वी आता भारतीय संघाला(team india) एक गुड न्यूज मिळाली आहे. कारण या फायनलपूर्वी आता भारतीय संघात एका खास व्यक्तीचे आगमन झाले आहे.

भारताने ऑस्ट्रेलियावर सेमी फायनलमध्ये दणदणीत विजय मिळवला आणि त्यानंतर त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आता भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये सामना(team india) होणार आहे तो न्यूझीलंडशी. सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते. त्यानंतर त्यांनी फायनल गाठली आहे.

पण यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात या चॅम्पियन्स ट्रॉफीत सामना झाला होता. हा सामना दुबईतच झाला होता. त्यावेळी भारताने न्यूझीलंडवर मात केली होती. त्यामुळे या फायनलपूर्वी भारताचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. पण त्याचबरोबर भारतीय संघाला आता फायनलपूर्वी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

भारतीय संघात आता आर. देवराज हे परतले आहे. आर. देवराज यांच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे भारतीय संघाला सोडून ते भारतामध्ये आले होते. पण त्यानंतर आता ते देशकार्यासाठी दुबईला परतले आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आर. देवराज हे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलपूर्वी भारतीय संघात दाखल झाले आहेत, त्यामुळे भारतीय संघासाठी आनंदाची बातमी असेल. कारण आर. देवराज यांच्या संघात येण्यामुळे बऱ्याच गोष्टी आता सुलभ होऊ शकणार आहेत.

आर. देवराज हे हैदराबाद क्रिकेट संघटनेमधील आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खास आर. देवराज यांची भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. भारतीय संघातील सर्व व्यक्तींची जबाबदारी पाहण्याची आर. देवराज यांच्यावर आहे. त्यामुळे आता फायनलपूर्वी आर. देवराज हे भारतीय संघात दाखल झाल्यामुळे खेळाडूंची कोणतीही गैरसोय होणार नाही. त्यामुळे आर. देवराज यांचे संघात परतणे हे भारताच्या खेळाडूंसाठी सर्वात महत्वाचे आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु असताना आर. देवराज यांना आपल्या आईचे निधन झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी बीसीसीआयकडे भारतात येण्याची आणि आईचे अंतिम दर्शन घेण्याची विनंती केली होती. ही विनंती बीसीसीआयने मान्य केली आणि त्यामुळे त्यांना भारतात पाठवण्यात आले होते. आऊचे अंत्यसंस्कार केल्यावर आर. देवराज यांनी थेट दुबईचे विमान पकडले आणि ते संघात दाखल झाले. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आर. देवराज हे भारतीय संघाबरोबर असतील. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची फायनल दुबईत रंगणार आहे.

हेही वाचा :

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर चाहत्यांचे होणार स्वप्नभंग; रोहित शर्मा करणार ‘या’ गोष्टीला अलविदा.. 

मराठी माणसावर प्ररप्रांतीय महिलांचा जीवघेणा हल्ला, ‘डोक्यात फरशी मारुन…’

‘जब वी मेट’, शाहिदने सगळ्यांसमोर करीनाला मारली मिठी, व्हिडीओ तुफान व्हायरल