महिला दिनी आली खुशखबर! मुलींना शिक्षणात १००% सवलत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने महिलांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी मुलींसाठी शिक्षण(education) शुल्क १००% माफ करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी राज्य सरकार मुलींना ५०% शुल्क सवलत देत होते. मात्र, आता संपूर्ण शुल्क सरकार उचलणार असल्याने लाखो विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यातील अनेक मुली आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडतात. हा निर्णय लागू झाल्यास गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थिनींसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर होईल. विशेषतः ग्रामीण भागातील मुलींना याचा मोठा फायदा होईल. महिला सशक्तीकरणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. मुलींना आर्थिक मदतीबरोबरच शैक्षणिक प्रगतीसाठीही संधी मिळावी, हा सरकारचा हेतू आहे. त्यामुळे हा निर्णय महिलांसाठी एक मोठी संधी ठरेल.

हेही वाचा :

मराठी माणसावर प्ररप्रांतीय महिलांचा जीवघेणा हल्ला, ‘डोक्यात फरशी मारुन…’

‘जब वी मेट’, शाहिदने सगळ्यांसमोर करीनाला मारली मिठी, व्हिडीओ तुफान व्हायरल

भारताला फायनलपूर्वी मिळाली गुड न्यूज, संंघात झाली या खास व्यक्तीची एंट्री