भरचौकात तरुणावर सपासप वार करत हत्या, दहशत पसरवण्यासाठी वाहनांची तोडफोड

नाशिक: शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असून, सिडको परिसरातील खुंटवड नगर येथे एका तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या(murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण नाशिक हादरले असून, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास भोसला स्कूलमागील संत कबीर नगरमधील रस्त्यावर हा रक्तरंजीत प्रकार घडला. अरुण राम बंडी (वय २५) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, जुन्या वादातून सातपूरच्या टोळक्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करून त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर(murder) आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत ३ संशयितांना ताब्यात घेतले असून, उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. हल्लेखोरांनी परिसरात दहशत माजवत दोन दुचाकींची तोडफोड देखील केली आहे.

या घटनेनंतर घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकाचे जवान दाखल झाले. अरुणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. त्याच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर रुग्णालयाबाहेर गर्दी केल्याने, पोलिसांनी शासकीय रुग्णालयात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

या घटनेमुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला असून, फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा :

‘मी देहदान करणार’; धनंजय देशमुखांनी वाढदिवसाला घेतला मोठा निर्णय

‘छावा’ पाहिला अन् ‘या’ किल्ल्यावर अफाट गर्दी जमली: खजिन्याच्या शोधात कुदळ, फावडे घेऊन…; Video Viral

दररोज न चुकता आवळा खाल्ल्यास 6 आजार होतात छुमंतर; आयुर्वेदातील रामबाण उपाय