उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावली

उपराष्ट्रपती(Vice President) जगदीप धनखड (वय 73) यांना छातीत वेदना आणि अस्वस्थता जाणवल्यामुळे रविवारी (९ मार्च २०२५) पहाटे २ वाजता नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.

एम्सच्या हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. राजीव नारंग यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या टीमकडून उपराष्ट्रपतींचे उपचार सुरू आहेत. त्यांना क्रिटिकल केअर युनिट (सीसीयू) मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उपराष्ट्रपतींच्या(Vice President) प्रकृतीची माहिती घेतली असून, ते एम्समध्ये भेट देण्यासाठी पोहोचले आहेत. देशभरातील नागरिक उपराष्ट्रपतींच्या लवकरात लवकर पूर्ण बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एम्समध्ये पोहोचले आहेत. लवकरच त्यांच्या आरोग्यविषयक अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे. धनखड यांच्या उपचारासाठी एम्समध्ये एक विशेष वैद्यकीय मंडळ स्थापन करण्यात आले असून, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे.

उपराष्ट्रपती धनखड यांचा राजकीय प्रवास मोठा आणि महत्त्वाचा राहिला आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना त्यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली. त्यांचा सत्ताधारी तृणमूल काँग्रेससोबत अनेकदा संघर्ष झाला. कडक आणि स्पष्टवक्ते अशी त्यांची प्रतिमा असून, त्यांच्या धडाडीच्या भूमिकेमुळे ते राजकीय चर्चेचा विषय ठरले आहेत.

हेही वाचा :

भरचौकात तरुणावर सपासप वार करत हत्या, दहशत पसरवण्यासाठी वाहनांची तोडफोड

कोल्हापूरजवळ BMW पार्क करून युवकाची धक्कादायक कृती; भाड्याच्या कारमध्ये घेतला धक्कादायक निर्णय!

गळा दाबला, कपडे काढले…; इस्रायलच्या महिला पर्यटकासह होमस्टेच्या मालकीणवरही अत्याचार