… म्हणून ‘तारक मेहता..’ फेम बबिताजीने अद्याप लग्न केलं नाही; कारण वाचून थक्क व्हाल!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टीव्ही जगतातील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील बबिताजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री(Entertainment news) मुनमुन दत्ता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत असते. तिच्या सौंदर्यावर असंख्य चाहते फिदा आहेत. मात्र, ती अद्याप अविवाहित का आहे? हा प्रश्न अनेकांना पडतो.

मुनमुन दत्ता हिचं नाव 2008 मध्ये ‘बिग बॉस’ फेम अभिनेता अरमान कोहली सोबत जोडलं गेलं होतं. मात्र, या नात्यात अरमानच्या तापट स्वभावामुळे तणाव निर्माण झाला आणि अखेर मुनमुनने त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

काही मीडिया रिपोर्टनुसार, व्हॅलेंटाईन डेसाठी दोघंही डेटवर गेले असताना त्यांच्यात वाद झाला होता. या वादादरम्यान अरमानने मुनमुनवर(Entertainment news) हात उचलला, असा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर मुनमुनने नातं संपवण्याचा निर्णय घेतला.

यानंतर मुनमुन दत्ताचं नाव ‘तारक मेहता..’ फेम अभिनेता राज अनाडकत सोबत जोडलं गेलं. दोघांचे लंच डेटचे फोटो व्हायरल झाले होते. मात्र, हे फक्त मैत्रीचे नाते आहे, असे दोघांनी स्पष्ट केले.

मुनमुनने तिच्या खासगी आयुष्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. मात्र, गेल्या अनुभवांमुळे ती लग्नाच्या निर्णयाबाबत सावध असल्याचे दिसते.

हेही वाचा :

प्रसिद्ध गायकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

महायुतीचा अर्थसंकल्प लोकप्रिय योजनांना कात्री

मटण विक्रीसाठी राज्यात ‘मल्हार सर्टिफिकेट’! नितेश राणेंची घोषणा