‘संजना, अजिबात मजा आली नाही,’ के एल राहुलने बुमराहच्या पत्नीला स्पष्टच सांगितलं, ‘मला 200 वेळा…’

भारताने चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकण्यात के एल राहुलनेही मोलाचा वाटा उचलला आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षण करणाऱ्या के एल राहुलने(cricekt) मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं. भारतीय संघाच्या फलंदाजीवर जेव्हा जेव्हा दबाव होता, तेव्हा त्याने संयमाने खेळी केली. डीआरएस कॉल घेताना त्याने योग्य सिग्नल दिल्याने कर्णधार रोहित शर्मालाही मदत मिळाली.

सहभागी झालेल्या आठ संघांपैकी भारत हा एकमेव संघ होता ज्याने पाच फिरकी गोलंदाज निवडले होते. यामधील रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे फलंदाजीइतही तितकेच चांगले असणं जमेची बाजू होती, जी इतर संघांकडे नव्हती. सुंदरला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. पण वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव या दोन विशेष फिरकीपटूंच्या सहाय्याने सर्वांनी विरोधी संघाला रोखण्यात महत्त्वाची कामगिरी केली.
न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या गट सामन्यापासून संघात खेळण्यास(cricekt) सुरुवात करणारा चक्रवर्ती, फक्त तीन सामने खेळल्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसह स्पर्धेत भारताचा संयुक्तपणे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून परतला. त्याने 20 च्या स्ट्राईक रेटने 9 बळी घेतले. कुलदीपने 7 बतर डावखुरा फिरकी गोलंदाज अष्टपैलू जडेजा आणि अक्षर यांनी 10 विकेट्स घेतले. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 26 बळी घेतले, जे आतापर्यंत कोणत्याही संघाने घेतलेले सर्वाधिक आहेत.
के एल राहुल स्टम्पच्या मागे उभा राहून या सर्वाचा साक्षीदार ठरला. पण जेव्हा जसप्रीत बुमराहची पत्नी आणि टीव्ही प्रेझेंटर संजनाने त्याला भारताच्या फिरकी गोलंदाजांसह खेळताना मजा आली का? असं विचारलं तेव्हा राहुलने उत्तर देत, ‘अजिबात मजा नव्हती संजना. जेव्हा हे स्पिनर्स गोलंदाजी करत होते तेव्हा मला 200 ते 250 वेळा स्क्वॉट मारावे लागले’. यानंतर दोघेही हसू लागले होते.
“ते उच्च दर्जाचे आहेत. खेळपट्ट्यांनी त्यांना थोडीशी मदत केली, ज्यामुळे ते आणखी धोकादायक बनले. त्यामुळे माझ्यासाठी यष्टींमागे उभे राहणं आणखी आव्हानात्मक होतं. त्यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, ज्या पद्धतीने त्यांनी त्या परिस्थितीचा वापर केला आहे ते अद्भुत आहेत,” असं राहुल पुढे म्हणाला.
“आयसीसी स्पर्धांमधील विजय फार सोपे नसतात आणि हा माझा पहिलाच आहे. त्यामुळे मी आज फार आनंदी आहे,” असंही राहुलने सांगितलं. “हा संपूर्ण सांघिक प्रयत्न होता, सर्व 11-12 खेळाडू उभे राहिले आणि त्यांना संधी मिळाली आणि आम्ही स्पर्धा जिंकण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे,” असंही तो म्हणाला.
के एल राहुल एकदिवसीय क्रिकेटमध्ये(cricekt) भारताचा आघाडीचा फलंदाज होता. पण फॉर्म गेल्यानंतर आणि सतत टीका होऊ लागल्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आलं होतं. ऋषभ पंतची जागा घेतल्यानंतर त्याची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली.
“माझ्या प्रशिक्षकांनी मला लहानपणापासूनच शिकवले आहे की क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि संघ तुमच्याकडून जे काही अपेक्षा करतो, ते तुम्ही करायला सक्षम असले पाहिजे,” असं राहुल म्हणाला.
“यासाठी खूप तयारी करावी लागते, मैदानाबाहेर खूप काम करावे लागते. मी फक्त चौथ्या, पाचव्या, सहाव्या क्रमांकावर मला आवडणाऱ्या फलंदाजांना पाहतो आणि त्यांच्याकडून शिकतो,” असंही त्याने सांगितलं.
हेही वाचा :
अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध दाखल होणार गुन्हा
आईने नशा करण्यास पैसे न दिल्याने जाळल्या 13 दुचाकी
अजित पवारांच्या घोषणेने वाढले मद्यविक्रेत्यांचे टेन्शन!