होळीच्या दिवशी चंद्र ग्रहण, सर्वच राशींवर पडणार प्रभाव; प्रत्येक राशीनुसार करा ‘हे’ उपाय

मेष आणि वृश्चिक राशी –
मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. चंद्रग्रहणानंतर या (Scorpio)राशीच्या लोकांनी मसूर, बडीशेप, गहू, गूळ, तांबे इत्यादी वस्तू दान कराव्यात. तसंच होळीच्या पूजेदरम्यान भगवान श्रीकृष्णाला रंग अर्पण करा.

वृषभ आणि तूळ राशी –
वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणानंतर पांढरे चंदन, साखर, दूध, दही, तांदूळ, पांढरी मिठाई इत्यादी पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करावे.

मिथुन आणि कन्या राशी –
मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या लोकांनी (Scorpio)चंद्रग्रहणानंतर हिरवी फळे, हिरवे कपडे इत्यादी वस्तू दान करावेत. त्यासोबतच गाईला हिरवे गवत खायला घालावे.

कर्क राशी –
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण झाल्यानंतर दूध, तांदूळ, मोती, चांदी, पांढरे कपडे दान करावेत. त्यासोबतच भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्यानंतर त्यांना लोणी आणि साखर अर्पण करा.

सिंह राशी –
सिंह राशीचा स्वामी ग्रहांचा राजा सूर्य देव आहे. चंद्रग्रहणानंतर (Scorpio)सिंह राशीच्या लोकांनी धान्य, गूळ, पितळ, केळी, दूध, फळे, डाळी, लाल फुले आणि लाल रंगाचे वस्त्र दान करावे.

मकर आणि कुंभ राशी –
मकर आणि कुंभ राशीचा स्वामी न्यायदेवता शनिदेव आहे. या राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणानंतर काळे कपडे, लोखंडी वस्तू, मोहरीचे तेल, काळे हरभरे किंवा उडीद डाळ दान करावी.

धनु आणि मीन राशी –
धनु आणि मीन राशीचा स्वामी देवगुरू बृहस्पति आहे. या राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणानंतर पिवळी फळे, केळी, हळद, पिवळे कपडे इत्यादी गोष्टी दान कराव्यात.

हेही वाचा :

उरले फक्त १२ तास, लाडक्या बहिणींच्या खात्यात आज मार्चचा हप्ता येणार?

सरंपच संतोष देशमुखांचा मृत्यूआधीचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल, VIDEO

‘मी पक्षाचा अध्यक्ष, तू टॉप काढून मसाज कर’; VIDEO काढून महिलेला धमकी