धक्कादायक! देशमुखांच्या साडूचा मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल

धनंजय देशमुख यांचे साडू आणि बेडूकवाडीचे सरपंच दादासाहेब(Shocking) खिंडकर यांचा एका व्यक्तीला बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर खिंडकर यांनी हा कौटुंबिक वाद असल्याचा दावा करत, हा व्हिडीओ जुना असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या व्हिडीओमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

व्हिडीओमध्ये काय दिसतंय? :


व्हायरल व्हिडीओमध्ये दादासाहेब खिंडकर एका व्यक्तीला अमानुष मारहाण करताना दिसत आहे. यानंतर त्याने सारवासारव करत, “हा कौटुंबिक वाद होता आणि तो आता मिटला आहे,” असे (Shocking)स्पष्टीकरण दिले.याशिवाय, खिंडकरने एका घरावर हल्ला करत गाडी फोडल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ २०१६ सालचा असून, त्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मार्चला होणार आहे. आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील बाळासाहेब(Shocking) कोल्हे यांनी या खटल्यात नवे पुरावे सादर करण्याची मागणी केली आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. तो गंगापूर रोड परिसरातील CCTV फुटेजमध्ये दिसल्याचे पोलिस तपासत आहेत.या घटनांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि राजकीय संघर्ष नव्याने उफाळून आला आहे.

हेही वाचा :

उरले फक्त १२ तास, लाडक्या बहिणींच्या खात्यात आज मार्चचा हप्ता येणार?

सरंपच संतोष देशमुखांचा मृत्यूआधीचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल, VIDEO

‘मी पक्षाचा अध्यक्ष, तू टॉप काढून मसाज कर’; VIDEO काढून महिलेला धमकी